दुकाने, आस्थपाना सकाळी १० सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार
दुकाने, आस्थपाना सकाळी १० सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार · आजपासून सुधारित नियमावली लागू · आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची सुविधा सुरु राहणार वाशिम, दि. ३१ : जिल्ह्यात ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत लॉकडाऊन लागू राहणार असून याबाबतची सुधारित नियमावली १ ऑगस्ट २०२० पासून लागू करण्यात येत आहे. जिल्ह्यात यापूर्वी परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना, सेवा सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच दवाखाने (पशुवैद्यकीय दवाखान्यांसह), मेडिकल स्टोअर्स २४ तास सुरु राहतील. मात्र, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास अथवा अशा ठिकाणी गर्दी आढळून आल्यास या आस्थापना, दुकाने बंद करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे. नवीन नियमावलीनुसार कृषि उत्पन्न बाजार समितीमधील सर्व प्रकारची कामे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहतील. दुध संकलन व विक्री, भाजीपाला बाजार सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु ठेवता येईल. सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत केवळ दुध संकलना...