खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलै
• शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा (प्रतिनिधी) : जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना पुढील तीन आर्थिक वर्षासाठी लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये सन 2020-21, 2021-22 व 2022-23 वर्षांचा समावेश आहे. ही योजना आता खरीप व रब्बी हंगामातील अधिसुचीत पिकांकरीता लागू करण्यात आली असून या योजनेची खरीप हंगाम 2020 ची अंतिम दिनांक 31 जुलै 2020 आहे. या योजनेकरीता खरीप ज्वारी, सोयाबीन, मुग, उडीद, तुर, कापूस व मका पिके अधिसुचीत करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना शेतमालच्या अनिश्चित उत्पन्नाची नुकसान भरपाई सामुहिक स्वरूपात मिळावी, या उद्देशाने ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना प्रतिकुल हवामान घटकांमुळे पेरणी, लावणी, उगवण न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान, पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती याबाबींकरीता विम्याचे संरक्षण मिळणार आहे. खरीप हंगाम सन 2020-21 पासुन योजनेत सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव बँकेस सादर करतेवेळी सर्व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावीत. या योजनेसाठी जिल्ह्याकरीता रिलायन्स इन्शुरन्स कंपनी लि. ब्लॉक अे, हेरिटेज हाऊस, तळ मजला, 6 अ, रमाबाई आंबेडकर, पुणे- 411001 या कंपनीला नियुक्त करण्यात आले आहे.
अर्ज भरण्यासाठी बँकामध्ये होणारी गर्दी टाळता यावी व शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणुन या हंगामापासून गावपातळीवर अधिकची सुविधा म्हणुन आपले सरकार सेवा केंद्राद्वारे म्हणजेच महा ई सेवा केंद्रावर सदर योजनेत सहभागी होता येणार आहे. विमा अर्ज करण्याची सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे. किंवा पिक विमा www.pmfby.gov.in या पोर्टलवर थेट अर्ज करू शकतील. तरी शेतकऱ्यांना पिक विमा संरक्षण मिळणेस्तव प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 31 जुलै 2020 पर्यंत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत याबबतची सुचना विमा कंपनी संबंधित बँक, कृषि / महसुल विभाग, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. ब्लॉक अे, हेरिटेज हाऊस, तळ मजला, 6 अ, रमाबाई आंबेडकर, पुणे – 411001 ई मेल rgicl.maharashtraagri @relianceada.com टोल फ्री क्रं 18001035499 या क्रमांकावर कळविण्यात यावी.
योजनेत सहभागासाठी नजीकच्या उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एन. एम नाईक यांचेवतीने करण्यात येत आहे.
- असा आहे विम्याचा हप्ता व संरक्षीत रक्कम पिक विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता रक्कम प्रति हेक्टर खालीलप्रमाणे – खरीप ज्वारी : विमा संरक्षीत रक्कम 25 हजार, हप्ता 500 रूपये (प्रति हेक्टर), मका : विमा संरक्षीत रक्कम 30 हजार, हप्ता 600 रूपये, तुर : विमा संरक्षीत रक्कम 35 हजार, हप्ता 700 रूपये, मुग : विमा संरक्षीत रक्कम 20 हजार, हप्ता 400 रूपये, उडीद : विमा संरक्षीत रक्कम 20 हजार, हप्ता 400 रूपये, सोयाबीन : विमा संरक्षीत रक्कम 45 हजार, हप्ता 900 रूपये आणि कापूस पिकासाठी विमा संरक्षीत रक्कम 45 हजार, हप्ता 2250 रूपये राहणार आहे. अर्ज भरताना ही लागणार कागदपत्रे
अर्ज भरताना आपला फोटो असलेल्या खातेपुस्तकाची प्रत, 7/12 उतारा, भाडेपट्टे करार असलेलया शेतकऱ्याचा करारनामा / सहमती पत्र, पेरणी घोषणापत्र, आधार कार्ड प्रत, आधार कार्ड उपलब्ध नसल्यास आधारकार्ड नोंदणी पावती किंवा किसान क्रेडीट कार्ड, नरेगा जॉबकार्ड कार्ड, वाहन चालक परवाना व मतदान ओळखपत्र यापैकी एक पुरावा सोबत ठेवणं आवश्यक आहे .
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME