क्रिसील फाउंडेशन चा उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

*बँक सेवा माहिती करिता मोफत ग्रामसहाय्य हेल्पलाईन क्रमांक ची सुरुवात*

क्रिसील फाउंडेशन चा उपक्रम 

रिसोड - कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर रिझर्व बँक ,स्टेट बँक आणि नाबार्ड यांच्या माध्यमातून क्रिसील फाउंडेशन च्या सहाय्यातुन मनिवाइज सेंटर च्या अंतर्गत  रिसोड तालुक्यातील बँक खातेधारक यांच्या साठी मोफत ग्राम सहाय्य हेल्पलाइन क्रमांक ची सुरुवात करण्यात आली आहे.
               ग्राम सहाय्य च्या माध्यमातून बँक खातेदार यांना लॉक डाऊन च्या काळात घर बसल्या आपले आर्थिक व्यवहार कसे करता येतील या विषयी मोफत माहिती देण्यात येत आहे, तसेच कोरोंना या आजारा बद्दल दक्षता बाबत जनजागृती ही या  ग्राम सहाय्य हेल्पलाइन क्रमांका च्या अंतर्गत करण्यात येत आहे,बँक खातेदार क यांना बँक मध्ये न येता आपले आर्थिक व्यवहार डिजिटल बँकिंग जसे भीम अप्स ,एईपीएस, यूपीआय, गुगल पे, इत्यादी माध्यमा विषयी माहिती देण्यात येत आहे.
                 सदर कामकाज जिल्हा अग्रणी बँक  व्यवस्थापक निनावकर ,नाबार्ड चे सहाय्यक व्यवस्थापक विजय खंडरे, क्रिसील फाउंडेशन चे राज्य समन्वयक शक्ती भिसे व जिल्हा समन्वयक सत्यपाल चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मनिवाइज सेंटर चे केंद्र व्यवस्थापक राजेंद्र पडघान ,क्षेत्र समन्वयक किशोर चक्रनारायण,संघपाल वाघमारे आदी कार्य करीत आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

‘मुंबई’चा वारसा सांस्कृतिक एकजुटीचा – ज्येष्ठ पत्रकार तथा खासदार कुमार केतकर

ग्रामीण उत्पादनाच्या ऑनलाईन मार्केटिंगवर भर द्या – कृषी व पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार मत्स्य उत्पादन, किसान क्रेडिट कार्ड वाटपात प्रगतीची आवश्यकता