रिसोड तालुक्यातील खेडेगावात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले
रिसोड:-दि. २२/७/२०२०
( भारत कांबळे)
मानसिक दुर्लभतेने व शैक्षणिक अभावामुळे.पछाडलेले रिसोड तालुक्यातील प्रत्येक खेडेगावातील तरूण युवकांनी रोजगारीचे साधन म्हणुन अवैध रित्या दारू विक्रीच्या धंद्याकडे आगेकुच केली असल्याचे दिसून येत आहे.पोलीस प्रशासनाचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष या बाबत कारणीभुत असल्याने अवैध रित्या दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे.रिसोड तालुक्यातील बेलखेडा फाटा ते शिरपुर रस्ता.बेलखेडा ते केशवनगर रस्ता. मसलापेन ते लेहनी रस्ता. मांगुळझनक ते कुकसा केनवड रस्ता.रिठद ते रिसोड रस्ता.रिसोड ते दापुरी रस्ता. सदर रस्त्याच्या प्रत्येक गावात फाट्यावर अवैध रित्या देशी दारु ्विक्री हा व्यवसाय खुलेआम सुरू असते.सध्या चालु स्थितीत रिसोड.मालेगाव. शिरपुर. या शहरातुन दारू तस्करा माफैत विक्रीसाठी दारु पुरविल्या जात असल्याची चर्चा नागरीकांमध्ये होताना दिसतेआहे.सदर गावातील युवकांची दारु विक्रीच्या ठिकाणी गद्री होत असताना पोलिसांची मुखदर्शक भुमीका सर्व काही सांगून जाते.वरिठ्ष्ठानी या कडे लक्ष केंद्रित करून कारवाई करने गरजेचे आहे.अन्यथा तरुण पिढी बरबाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME