उमेद अभियानांर्तगत येवता येथे परस बाग कार्यशाळा संपन्न
उमेद अभियानांर्तगत येवता येथे परस बाग कार्यशाळा संपन्न
येवता वार्ताहर :- ग्रामीण जीवन्नोती उमेद अभियानांर्तगत बचत गटासाठी महिला अधिकाधिक सक्षम आणि स्वावलंबी होण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.शेंद्रीय पद्धतीने भाजीपाला पिकवून आपला उद्र्निर्वाह भागवून नैसर्गिक , पोष्टिक,ताजा आणि विषमुक्त भाजीपाला आपल्या कुटुंबाला उपलब्ध होऊन आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राहावे हा उद्देश बाळगून परसबाग हा उपक्रम राबविला जातो.
येवता येथे जवळपास १७ बचत गट कार्यरत असून येवती येथील C T C सौ रुपाली शिंदे यांनी येवता येथे येऊन परसबाग कार्यशाळेचे आयोजन केले होते. C T C सौ रुपाली शिंदे आणि येवता येथील ICRP सौ.सविता देशमुख यांनी प्रत्येकाच्या शेतात जाऊन परसबागेसाठी नियमाप्रमाणे जागेची आखणी करून दिली.उपस्थित महिलांना व्यवस्थित समजाऊन सांगितले.आखून दिलेल्या प्रत्येक भागात कोणता भाजीपाला कोणत्या ऋतू मध्ये लावायचा आणि त्याची निगा कशी राखायची याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. येवता येथे त्यांनी चोपडे ,जारे,देशमुख,यांच्या शेतात जाऊन सर्व प्रात्यक्षिक समजावून सांगितले.तसेच येवता येथील परसबागे प्रमाणेच त्यांनी व्याड,चिखली,वनोजा,बेलखेड,कोयाळी खुर्द,या सहा गावामध्ये परसबाग आखणी करून परसबाग बनविण्याचे काम चालू केले.त्यांना या उपक्रमासाठी श्री गंगावने सर,कल्याणकर सर,आणि जाधव मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME