बेलखेडा येथील पाणी भरणाऱ्या महिलांची रस्त्याअभावी दुर्दशा
बेलखेडा येथील पाणी भरणाऱ्या महिलांची रस्त्याअभावी दुर्दशा (रिसोड :-भारत कांबळे). बेलखेडा येथील . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ते महादेव मंदिर रस्त्यावर महिलांना पाणी भरण्यासाठी नळयोजने द्वारे नळ आहे.मात्र नळावर पाणी भरण्यासाठी ये-जा करणा-या महिलांना पाणी साचलेल्या गटारातुन पाणी भरावे लागत आहे.नळापासुन काही अंतरावर लक्ष्मी नारायण ताजने.विमल हरीभाऊ ताजणे. शिला अंबादास ताजणे. विद्या अरुण ताजणे. लक्ष्मी नारायण रनखांब.अदिचे घरे असल्याने रस्त्यातच त्यांच्या दारा समोर खड्या पडुन चिखलाची गटार साचल्याने .या गटारीतुनच या महिलाना पिण्याचे पाणी भरावे लागत आहे.या गटारात महिला पाण्याचे भांडे घेऊन पडु शकतात.व अपघात घडु शकते.रस्त्याअभावी चिखल गटारातुन पाणी भरावे लागत असल्याने त्यांना त्वचारोग होण्याची दाट शक्यता आहे. महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपिट होत आहे. संबधिताने .या रस्त्यावरील खड्डे पडलेले बुजुन रस्ता बांधुन द्यावा.अशी मागणी महिलांनी केली आहे. रस्त्याची दुरुस्ती न केल्यास रिसोड पंचायत समिती कार्यालया समोर उपोषन धरण्याचा निर्धार केला आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME