पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या राज्यातील सर्व महाविद्यालयाच्या इमारतींच्या दुरुस्ती साठी शासनाने तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी
आज औरंगाबाद येथे विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन आपली मातृ संस्था पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या राज्यातील सर्व महाविद्यालयाच्या इमारतींच्या दुरुस्ती साठी सन 2016 साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रोप्यमहोत्सवी जयंती वर्षी तत्कालीन सरकारने समता व सामाजिक न्याय वर्षाची घोषणा करून 125 कोटी चा निधी देण्याची घोषणा केली होती.
त्याअंतर्गत पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या दुरवस्था झालेल्या महाराष्ट्रातील विविध जिल्हातील शाळा, महाविद्यालय,व वसतिगृहाच्या जीर्ण इमारती च्या विकास निधीसाठीचे प्रस्ताव दाखल केले परंतु आजतागायत एक ही रुपयांचा निधी देण्यात आला नाही परिणामी अनेक इमारती ह्या दुरावस्थेत आहेत.
शासनाने घोषित केलेली समता व सामाजिक न्याय वर्षाची घोषणा फसवी आहे तत्कालीन शासनाने निधी दिला नाही व विद्यमान सरकारने तो निधी दाबुन ठेवला आहे.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांच्या कडे सतत पाठपुरावा करून देखील सदरचा निधी देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने ह्या विरोधात रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने सर्व जिल्ह्यामध्ये निवेदन देऊन तात्काळ निधी देण्याची मागणी करण्यात आली आहे या विषयावर राज्यभारत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात.
औरंगाबाद निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना भेटून निवेदन सादर करण्यात आले आहे.
यावेळी ऍड भंते बुद्धपाल,रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम,सरचिटणीस ऍड अतुल कांबळे,संघटक प्रा.प्रबोधन बनसोडे,विद्यापीठ अध्यक्ष सागर प्रधान,सिल्लोड तालुकाध्यक्ष सोहेल शेख,सागर भोकारे, महेंद्र तांबे,गजानन कांबळे आदींसह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME