कोरोना पेक्षा आता बेरोजगारीचे संकटं
# कोरोना पेक्षा आता बेरोजगारीचे संकटं#
बेलखेडा :-दिनांक १६/७/२०२०
( वार्ताहर).
दिवसेदिवस कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गोरगरीब जनतेला . दररोज अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे.त्यांना कुणीही रोजगार उपलब्ध करून देत नाही.कुणी रोजगार दिला तर मोबादला देण्यात टाळाटाळ होते.अशा कठीण प्रसंगी अनेक अडचणी मुळे गरीब हातावर पोट असलेल्या लोकांनवर उपासमारीची वेळ आली आहे.रोजगारांच्या निमीत्ताने शहराकडे धाव घेतलेले अनेक मजुर कामगार आपल्या गावाकडे परत लेले आहेत.आता मात्र रोजगारासाठी शहरात परत जाण्यास अनेक जन अनुकूल असल्याने गजबजलेल्या खेड्यात रोजगारी वाढली असुन .कोरोनापेक्षा मोठे संकट आवासुन उभे राहिले आहे.रिसोड तालुक्यातील बेलखेडा.आसेगावपेन.वरूडतोफा.कोयाळी. रिठद.हिवरापेन. पारडी.खडकी व इतर अनेक गावातील असंख्य मजुर.कामगार रोगारीच्या निमित्ताने मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद सुरतृ सारख्या महानगरात वास्तव्याला राहत होते.मार्च मध्ये सुरुवात झालेल्या कोरोनाच्या संकटामुळे सर्व देशभर लाॅकडाऊन संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे मजुरांचे लोंढेच्या लोंढे हाताला काम नसल्याने व कोरोना पासुन सुटका व बचाव करण्यासाठी आपापल्या गावाकडे परतले . त्यामुळे खेडी गजबजली आणखी सदर शहरे ओस पडली.पण खेड्यात रोजगार उपलब्ध नसल्याने या लोकांवर उपासमारीची वेळ आली.
एक जुन पासुन हळुहळु एका एका व्यवसायाला सुरुवात झाली. त्यामुळे हातावर उपजिवीका भागविणारे अनेक जन परत सदर शहराकडे धाव घेत असुन.जादा दराने टॅव्हल्सवाले तिकीट आकारणी करीत आहेत.बरेच जन अजुनही गाव सोडण्याच्या मनस्थितीत नसल्याने दिसुन येत आहे.शहरात मजुरांचा तुटवडा तर खैडेगावात बेरोजगारांची फौज वाढली आहे.अनेक कामगार शेती व अनेक व्यवसायाचा मार्ग निवडत असुन. गावातच राहत रोजगाराची संधी शोधत आहेत.तर कुणी शहरातुन आलेले कामगार.बेरोजगार. दारू विक्रीच्या दिशेने पाऊल उचलत आहेत.शासन गोरगरीबांना मोफत तांदुळ डाळ देत असलेतरी या बरोबर लागणाऱ्या अनेक वस्तु खरेदी करण्यासाठी लोकांनकडे पैसा नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.हे संत्र्याच्या नाकारता येत नाही.शासनाने यांच्या साठी रोजगार उपलब्ध करून द्यावा.तसेच विज बिल मार्च ते नोंव्हेंबर दिवाळी प्रर्यंत चे माफ करण्यात यावे.अन्यथा दारू विक्री करणाऱ्याना अवर घालता येणार नाही.या बाबीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME