संत सावता महाराज यांच्या 726 व्या पुण्यतिथी निमित्य रक्तदान शिबीर संपन्न
कोरोना या महाभयंकर रोगाच्या काळात आजारी पडलेल्या रोग्यांना रक्ताची आवश्यकता असते.याचा विचार करून संत सावता महाराज यांच्या 726 व्या पुण्यतिथी निमित्य सोसिएल डिस्टन्स चे काटेकोर पणे पालन करून साई सावता ग्रुप च्या विशेष पुढाकारातून व सेवार्थ चॅरिटेबल ट्रस्ट च्या सहकार्याने आयोजित भव्य रक्तदान शिबीर चंडिका वेश वाशिम येथे आयोजित केले असता .सामान्य रुग्णालयाची सर्व टीम कॅम्प या करीता हजर होती त्यात तीन महिलांनी रक्तदान केले त्या महिला रक्तदात्यांना रक्तदानाचे प्रमाणपत्र व संत सावता महाराजांची प्रतिमा पी. आय. मा.भारद्वाज मॅडम,व सौ.किरण गि-हे राष्ट्रीय अध्यक्ष महिला आघाडी तथा राज्य सदस्य वंचित बहुजन आघाडी ,सौ.अरुणा विनोद जाधव या महिलांना देतांना मा.उपाध्यक्ष न प वाशिम आदरणीय नारायणराव जाधव,निवृत्त शिक्षक आदरणीय इंगोले सर,कृ उ बाजार समिती संचालक गजाननभाऊ जाधव,समाजसेवक संजयभाऊ इंगोले,युवा सेना शहरप्रमुख गजुभाऊ ठेंगडे,समाजसेवक संतोषभाऊ जाधव.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME