हिंगोली : कोविड-19 चे जिल्ह्यात नवीन 12 रुग्ण तर 2 जणांचा मृत्यू
120 रुग्णांवर उपचार सुरु
हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात 12 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले असून 2 जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी माहिती दिली आहे.
यामध्ये श्रीनगर हिंगोली येथील 2 व्यक्ती, रिसाला बाजार हिंगोली येथील 2 व्यक्ती, गायत्री नगर हिंगोली येथील 1 व्यक्ती, मस्तानशहा नगर हिंगोली येथील 1 व्यक्ती, तालाबकट्टा हिंगोली येथील 1 व्यक्ती, पारडी ता. वसमत येथील 2 व्यक्ती, शिवाजी नगर वसमत येथील 2 व्यक्ती आणि कनेरगाव वसमत येथील 1 व्यक्ती असे एकुण 12 जणांना कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
तर हिंगोली येथील आझम कॉलनी 1 आणि मंगळवारा 1 असे 2 रुग्णांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला आहे.
तसेच कोरोना केअर सेंटर, वसमत अंतर्गत एकूण 1 कोविड-19 रुग्ण आणि जिल्हा रुग्णालय हिंगोली येथील 3 कोविड-19 रुग्ण असे एकूण 4 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्ड येथे भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 8 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 452 रुग्ण झाले असून त्यापैकी 327 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 120 रुग्णांवर उपचार चालू आहेत. तसेच कोवीड-19 मुळे 5 व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME