पोलीसांनी खाक्या दाखवताच मदीराधुंद व सैराट झालेल्या गटसचिवाने मागितली माफी...


• पोलीसांनी खाक्या दाखवताच सावळदबारा येथे वि.का.सोसायटीच्या मदीराधुंद व सैराट झालेल्या गटसचिवाने मांगीतली माफी...

• पत्रकारास दिल्या होत्या शिव्या.....
• व्हीडीओ झाला व्हायरल.....
--------------------------
सोयगाव (प्रतिनिधी) :-  तालुक्यातील सावळदबारा येथील  विविध कार्यकारी. सोसायटीचे गटसचिव यांनी केंद्रीय पत्रकार संघाचे कोषाध्यक्षास जिवे माण्याची धमकी देत अशील शिवीगाळ केली असता पोलीसांनी खाक्या दाखवताच गावक-यांसमोर जाहीर माफी मांगीतली माफी नामा लिहुन दिल्याची घटना (दि.१७) शुक्रवारी सावळदबारा ता.सोयगाव  येथे घडली.
सावळदबारा दुर्गम डोंगराळ भागात वि.का.सोसायटीचे गटसचिव सोसायटी कर्ज वाढवून देण्यासाठी शेतक-यांना लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार कें.प.संघाचे पदाधिकारी सुनिल माकोडे यांना केली असता परिसरातील संघटनेचे पदाधिकारी स्टींग आपरेशन करुन बातमी घेण्यासाठी गेले असता ही बाब गटसचिव असलेले सोनु चव्हाण यांच्या लक्षात आल्याने कर्तव्यावर मदीरा ढोसललेले चव्हाण यांनी व्हीडीओ स्टींग दरम्यान अनावर होत उपस्थीत पत्रकार माकोडे यांना अवाच्छ असभ्य भाषेत शिवीगाळ केली असता. सावळदबारा पोलीस दुरक्षेत्राचे जमादार एच.एस मोरे यांना पत्रकार स्वरक्षण कारद्यानुसार गटसचिवावर गुन्हा दाखल करा  मागणी साठी पत्रकारांनी पोलीस चौकी समोर सामाजिक डीस्टन ठेवुन ठीय्या आंदोलन केले. दरम्यान पोलीस जमादार मोरे यांनी पत्रकारांच्या तक्रारीवरुन गटसचिव सोनु चव्हाण वि.वि.कार्यकारी सोसायटी येथे घेण्यास  गेले असता. पोलीसी खाक्या दाखवताच त्याचे धाबे दनाणले व मी या नंतर कर्तव्यावर असतांना दारु पिणार नाही.शेतक-यांना लाच मागनार नाही. नशेत माझेकडून चुक झाली. मला पदरात द्या,एक संधी सुदरण्यासाठी द्या म्हणुन विनवण्या करत जाहीर माफी मागीतली व सर्वा समक्ष लेखी स्वरुपात माफी नामा दिला. यावेळी सावळदबारा येथील पत्रकार बांधव रहीम खान, गणेश खैरे, जब्बार तडवी, विजय कुल्ली, सुनील चव्हाण, अज्ञानसिंग चव्हाण, संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ हजर होते.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू