एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी रात्रीची पोलिस गस्त वाढवावी नागरिकांची मागणी


एकाच  रात्री तीन ठिकाणी चोरी
रात्रीची पोलिस गस्त वाढवावी नागरिकांची मागणी 
नांदेड/हिमायतनगर (नागोराव शिंदे) :-  
हिमायतनगर शहरातील शंकर नगर येथे वयोवृद्ध  अंध पति हे दांमपत्य मागील कित्येक वर्षा पासुन राहत होते व त्यांचा मुलगा नांदेड येथे वास्तव्यास राहतो सुरेश देशपांडे हे दोन्ही डोळ्याणि अंधळे असल्यामुळे व त्यांच्या पत्नी शोभा सुरेश देशपांडे हे दोघे घरी राहत होते ह्याचा फायदा घेऊन आदन्यात चोरट्यांनी त्यांच्या घरामागील असलेली खिडकी तोडूंन त्यांच्या घरात प्रवेश केला व त्या दांमपत्यास बे दम मारहान करुण त्या  वयोवृद्ध महिलेच्या कानातील सोन्याची फुले झटका मारुन काना सह घेऊन गेले व त्यांच्या घरातील रोख रक्कम व इतर मोल्यावान वस्तु घेऊन ते पसार झाले. त्याच रात्री शहरातील जाज्वल्य देवस्थान कनकेश्वर मंदिराची दानपेटी फोडून दान रूपी जमा झालेली रक्कम घेऊन त्याच मंदिराच्या शेजारी असलेल्या जिलानी हाशमी यांच्या शेतातील खताची पोती व फवारनिचे औषध घेऊण त्यांच्या कोठ्याची नास धुस करुण तेथून ते पसार झाले त्यामुळे हिमायतनगर शहरात दिवसेंन दिवस भुरट्या चोरांचे प्रमाण वाढत आहे व कोरोना महामारीच्या संकटा मध्ये  शहरातील पोलिस व्यस्त असल्यामुळे रात्रगस्तीसाठी पोलिस प्रशासन कमी पडत आहे त्यामुळे ह्याचा फायदा घेऊन शहरा सह तालुक्यातील भुरट्या चोरांनी शहरात धुमाकूळ घातला आहे या सततच्या चोरीच्या घटनेमुळे तालुक्यातील जनता भयभीत झालि आहे या  तिन्ही घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक इंगळे  बिट जमादार लक्षटवार   हे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू