आदिवासी गावांच्या विकासासाठी१६० कोटी रुपयांचा निधी वितरीत - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ • ५ हजार ९८२ गावांचा समावेश

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील (पेसा क्षेत्र१३ जिल्ह्यातील ५ हजार ९८२ गावांकरिता ५ टक्के थेट अबंध निधी योजनेचा १६० कोटी ७३ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. हा निधी ग्रामसभांनी संबंधीत आदिवासी गावांतील विविध विकास कामांकरिता खर्च करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

आदिवासी भागातील गावांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी हा निधी थेट त्या गावांना देण्याची योजना आहे. या निधीतून गावांमध्ये विविध पायाभूत सुविधांचा विकासवनहक्क अधिनियम व पेसा कायद्याची अंमलबजावणीआरोग्यस्वच्छता व शिक्षण,वनीकरणवन्यजीव संवर्धनजलसंधारणाची विविध कामेवनतळीवन्यजीव पर्यटनास चालना देणारे उपक्रमवन उपजिविका आदी विविध कामे करता येतात.  यापुर्वी ही योजना आदिवासी विकास विभागाअंतर्गत कार्यरत होती. परंतु जनजाति सल्लागार परिषदेच्या पन्नासाव्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार १९ जून २०१९ पासून ही योजना ग्रामविकास विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. या योजनेकरिता आवश्यक निधी वित्त विभागाने ग्राम विकास विभागास हस्तांतरीत केलेला आहे. राज्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन आदिवासी क्षेत्रातील गावांमध्ये चांगल्या सुविधा निर्माण केल्या जातीलअसे मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले.

योजनेअंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार वितरीत निधीची उपयोगिता होत असल्याबाबतची खात्री संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करावीअशा सूचनाही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिल्या आहेत. 

१३ जिल्ह्यातील ५ हजार ९८२ गावे

राज्यातील गावांना पुढील प्रमाणे निधी वितरीत करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील १६६ गावांना ३ कोटी २९ लाख,अमरावती जिल्ह्यातील ३०१ गावांना ८ कोटी २२ लाखचंद्रपूर जिल्ह्यातील १९५ गावांना २ कोटी ०२ लाखधुळे जिल्ह्यातील १८७ गावांना १० कोटी ३५ लाखगडचिरोली जिल्ह्यातील १ हजार २१७ गावांना १२ कोटी २५ लाखजळगाव जिल्ह्यातील ५८ गावांना २ कोटी ३४ लाखनांदेड जिल्ह्यातील १७८ गावांना २ कोटी ४१ लाखनंदुरबार जिल्ह्यातील ८६९ गावांना ३७ कोटी २९ लाखनाशिक जिल्ह्यातील १ हजार ४५ गावांना ३३ कोटी ५२ लाखपालघर जिल्ह्यातील ९१० गावांना ३५ कोटी ६२ लाखपुणे जिल्ह्यातील १२९ गावांना २ कोटी ९१ लाखठाणे जिल्ह्यातील ४०३ गावांना ६ कोटी ५३ लाख तर यवतमाळ जिल्ह्यातील ३२४ गावांना ३ कोटी ९८ लाख याप्रमाणे एकुण १६० कोटी ७३ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले. लोकसंख्येनुसार हे निधी वितरण करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू