रिसोड तालुक्यातील गोरगरीब चिंतेत घरपट्टी भरण्याचा तगादा
रिसोड तालुक्यातील गोरगरीब चिंतेत घरपट्टी भरण्याचा तगादा
(रिसोड प्रतिनिधी ). वाशिम जिल्ह्यात लाॅकडाऊन संचारबंदी लागू असल्याने.गोरगरीब कुटुंबियांना काम नाही.प्रती माणुस तिन किलो गहु पाच किलो तांदूळ शासनाच्या या धान्य वाटपाच्या आशेने आपला प्रंपच भागवीत आहेत.मात्र रिसोड तालुक्यातील ग्रामपंचायत सचिव व प्रशासन घरपट्टी भरा अन्यथा तुमचा पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा अर्ज स्विकारल्या जाणार नाही.असा तगादा लावत आहेत.गावात आॅनलाईन पद्धतीने लाॅभाथ्याकडुन अर्ज भरुन घेतल्या जात असुन अर्जा सोबत आधारकार्ड घेत आहेत.पंरतु गोरगरीबांना मजुरीचे काम नसल्याने पैसा कुठून येनार.घरपट्टी कशी भरणार हा प्रश्र्न अनेकांना पडलेला आहे.तरी घरपट्टी पाणीपट्टी मार्च ते डिसेंबर २०२० प्रर्यंत ची घरपट्टी पाणीपट्टी थकबाकी माफ करण्यात यावी.व गोरगरीब जनतेला घरपट्टी भरण्याचा तगादा लाऊ नये.गोरगरीब जनतेला सदर गावातील प्रशासनाने दिलासा. द्यावा अशी मागणी जनतेमधुन होत आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME