४ ऑगस्ट रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

४ ऑगस्ट रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

वाशिम, दि. ३१ (जिमाका) : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी एकाच ठिकाणी होणारी लोकांची गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे ४ ऑगस्ट २०२० रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. पहिल्या सोमवारी शासकीय सुट्टी येत असल्यास त्यानंतरच्या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी हा लोकशाही दिन आयोजित केला जातो. मात्र, ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात एकाच ठिकाणी लोकांनी एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे ४ ऑगस्ट रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

‘मुंबई’चा वारसा सांस्कृतिक एकजुटीचा – ज्येष्ठ पत्रकार तथा खासदार कुमार केतकर

ग्रामीण उत्पादनाच्या ऑनलाईन मार्केटिंगवर भर द्या – कृषी व पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार मत्स्य उत्पादन, किसान क्रेडिट कार्ड वाटपात प्रगतीची आवश्यकता