शिष्यवृत्याकरीता वित्त विभागाने मंजूरी द्यावी राहुलदेव मनवर यांची मागणी
शिष्यवृत्याकरीता वित्त विभागाने मंजूरी द्यावी
रिसोड:-दिनांक २०/७/२०(भारत कांबळे) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती निधीला वित्त विभागाने मंजूरी द्यावी अशी मागणी राहुलदेव मनवर यांनी राज्याचे वित्त विभागाचे प्रधान सचीव यांना ई मेलद्वारे व भ्रमणध्वनीद्वारे केली.
राज्यात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या २०१९-२० सत्रातील विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत परतावा न मिळाल्याने ती रक्कम मिळण्याकरीता मनवर यांनी १३ मे रोजी शासनास निवेदन पाठवून मागणी केली होती. त्यावर शासनाने सामाजीक न्याय विभागाचे आयुक्त यांना तसा प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानंतर सा.न्या.विभागाचे राज्य आयुक्त राजेंद्र दराडे पुणे यांनी तसा प्रस्ताव शासनास पाठवला. त्यानंतर सामाजीक न्याय विभागाने "भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना" या विषयाचा मागणी प्रस्ताव नस्ती क्र.बीसीएच प्र.क्र.१२०/२०२०/शिक्षण-२ दि.१६ जुलै रोजी वित्त विभागास मंजुरीकरीता पाठवीला आहे. त्याला वित्त विभागाने मंजुरात देवून अमरावती विभागातील विद्यार्थ्यांना तात्काळ रक्कम देण्यात यावी अशी मागणी राहुलदेव मनवर यांनी राज्याचे वित्त विभागाचे प्रधान सचीव गदरे यांना ई मेलद्वारे व भ्रमणध्वनीद्वारे केली. याकरीता मनवर यांनी सामाजीक न्यायमंत्री धनंजय मुंडे, प्रधान सचीव पराग जैन, आयुक्त प्रविण दराडे, उपायुक्त कदम, मुख्यमंत्री कार्यालय, अमरावती विभागीय आयुक्त यांचेशी संपर्क साधून याबाबत योग्य पत्रांच्या आधारे मागणी व्हाॅट्सअॅप द्वारे व भ्रमणध्वनी केली होती. त्यामुळे येत्या आठवडाभरात अमरावती विभागातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME