कोरोना संसर्गजन्य आजाराला अजीबात घायबरु नका
कोरोना संसर्गजन्य आजाराला अजीबात घायबरु नका रिसोड :- दिनांक १९/७/२०२०( प्रतीनिधी भारत कांबळे) /आपल्या आजूबाजू ला कोरोना रुग्ण सापडत आहेत, याचे जास्त टेन्शन घेऊ नका. सगळ्यात महत्वाचे जो कोणी कोरोना positive होईल त्याच्या बद्दल भीती, घृणा.मनामध्ये आणू नका, कारण ही वेळ कोणावरही येऊ शकते. पण सगळ्यात महत्वाचे या आजाराला जास्त घाबरू नका. अनेक तज्ञ डॉक्टरांचे म्हणने आहे की रोगा पेक्ष्या ? भीतीने जास्त लोक मरत आहेत, त्याच्याफक्त भीती आणि हार्ट अटॅक ने. कोणतीही negative बातमी पसरू देऊ नका. एकमेकांना सतत फोन वर बोला, मन हलकं करा, कोरोना वर जास्त बोलू नका, बोलला तर फक्त चांगलं बोला. दुसऱ्याला आधार वाटेल असेच बोला. आज सगळे चिंतेत आहेत त्यामुळे खाली उतरायला पण घाबरतात. काळजी घ्यायचीच आहे, पण मानसिक त्रास होईल इतकी पण नाही. तणाव हा वेगळ्या आजारांना आमंत्रण आहे. तणाव रहित राहायचे तर, एकटे कोंडून घेऊन चालणार नाही. मोकळा श्वास घ्या, सर्व मित्रांशी कायम बोलत राहा. त्यातून मन हलकं करा. ही आजच्या काळाची गरज आहे. सर्वांशी कायम बोलत राहा, फक्त कोरोना विषयी अजिबात बोलू नका, किंवा चांगले फक्त धीर देणारे बोला. बघा फरक वाटेल, मन शांत होईल, चांगली झोप लागेल, आणि तरच तब्बेत चांगली राहील. अजिबात घाबरू नका आणि दुसर्यांना घाबरवू नका .
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME