गाडगे महाराज उच्च माध्यमिक विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम!
गाडगे महाराज उच्च माध्यमिक विसंतद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम!
कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल 99%
रिसोड, (भारत कांबळे)
तालुक्यातील मोठेगाव येथील संत गाडगे महाराज उच्च माध्यमिक विद्यालयाचा फेब्रुवारी मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला असून महाविद्यालयाने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत महाविद्यालयाचा यावर्षीही निकाल तब्बल 99.07 लागला असून विद्यालयाने आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
सदर परीक्षेमध्ये विद्यालय मधून एकूण 93 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते, त्यापैकी 92 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली त्या पैकी 91 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
महाविद्यालया मधून 90% गुण घेऊन प्रथम येण्याचा मान कु.सायली विठ्ठल मुठठे हिने मिळवला तर कु.पायल शिवाजीराव देशमुख हिने 88% टक्के गुण घेऊन द्वितीय तर स्वप्निल माणिकराव घोंगडे 85.23%, कु.शुभांगी अशोक कुंदर्गे 84.92%, कु. विनया प्रदीपराव देशमुख हिने 83.83 % गुण घेऊन अनुक्रमे 3, 4, 5 क्रमांक मिळवले.
महाविद्यालयाचे प्राविण्य श्रेणीमध्ये एकूण 26 विद्यार्थी आलेत, प्रथम श्रेणीमध्ये 55 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन महाविद्यालयाचे संस्थापक दत्तरावजी धांडे, संचालक नागेशभाऊ धांडे, प्राचार्य, शिक्षक, तथा इंग्लिश स्कूल च्या शिक्षिका तसेच कर्मचाऱ्यांनी केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME