तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत सीमा भागातील नवीन शासकीय मराठी महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात आढावा बैठक संपन्न

सीमा भागात स्थापन करण्यात येणाऱ्या महाविद्यालयाच्या कामाला गती देण्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचे निर्देश
सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाही – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत
सीमा भागातील नवीन शासकीय मराठी महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात आढावा बैठक संपन्न
मुंबई, दि.19 : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागाची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संचलित नवीन शासकीय मराठी महाविद्यालय स्थापन करण्यात येत आहे. या महाविद्यालयाच्या कामाला अधिक गती द्यावी यासाठी आवश्यक ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सीमा भागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी नवीन शासकीय मराठी महाविद्यालय स्थापन करण्यासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.
श्री. सामंत म्हणाले, सीमा भागात महाविद्यालये लवकर स्थापन करणे, तिथे शैक्षणिक सुविधा निर्माण करणे गरजे आहे. त्यासाठी उपलब्ध जागेची पाहणी करून घेणे, अभ्यासक्रम तयार करणे, याबाबतचा तातडीने आराखडा तयार करावा. सीमा भागातील मराठी भाषिक बांधवांशी चर्चा करून शिक्षणासाठीच्या त्यांच्या अडचणी काय आहेत हे समजून घेऊन त्यांच्या गरजा लक्षात घेऊन शैक्षणिक आराखडा तयार करणे आवश्यक आहे. सीमाभागातील मराठी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन त्यांना अधिक दर्जेदार शिक्षण या महाविद्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावे असेही श्री. सामंत यांनी यावेळी संगितले.
बैठकीला आमदार ऋतुराज पाटील, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, उच्च शिक्षण संचालक धनराज माने,दीपक पवार उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू