सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना त्वरित द्या अन्यथा आंदोलन...
सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना त्वरित द्या अन्यथा आंदोलन...उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी केले निवेदन सादर.
रिसोड तहसीलदार यांच्या माध्यमातून मा. मुख्यमंत्री याना निवेदन सादर;
विद्यार्थ्यांनी दिला बंद चा इशारा !
रिसोड तालुक्यातील १०० विध्यार्थ्यांचे तहसीलदार कार्यालया मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, भारत सरकार शिष्यवृत्ती आणि इतर सर्व योजनांचे लाभ विद्यार्थाना तत्काळ वितरित करण्यात यावे आशा मागणीचे निवेदन विद्यार्थ्यांनी आज तहसीलदार रिसोड यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनाची प्रतिलिपी मा. उपमुख्यमंत्री, मा. वित्तमंत्री कार्यालय, मा.सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग मंत्री, राज्य मंत्री, तसेच सचिव आणि समाज कल्याण कार्यालय वाशिम, बुलढाणा, व औरंगाबाद याना निवेदन प्रतिलिपीत पाठवण्यात आले आहे. निवेदनातून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शासनाच्या वतीने विध्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शिष्यवृत्या योजना देण्यात येतात. मात्र गेल्या काही महिन्या पासून प्रशासकीय पातळीवर शिष्यवृत्ती व योजना मंजूर असून ही त्या प्रलंबित असल्याने पात्र लाभार्थ्यांना अजून निधी वितरित करण्यात आलेला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने चे पात्र विद्यार्थी हे गरीब कुटुंबातील असल्यामुळे विध्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना कोणतीही आर्थिक अडचण येण्यास तूर्तास काही प्रमाणात मदत होते. परंतु अचानक आलेल्या कोरोना संकटा मुळे विध्यार्थ्यांचे समान,शैक्षणिक साहित्य शैक्षणिक संस्था ठिकाणी खाजगी भाड्याने असल्या ठिकाणीच अडकून असल्यामुळे घर मालक फोन करून घर भाडे देण्यासाठी विध्यार्थ्यांना तगडा लावत आहेत.
तरी शासनाने ४ मे चा अध्यादेश रद्द न करता त्यातून सर्व शिष्यवृत्ती व योजना वगळून तात्काळ लाभ विध्यार्थ्यांना वितरित करण्यात यावा अन्यथा विध्यार्थी लोकशाही मार्गाने आंदोलन करतील.असा इशारा विद्यार्थ्यांनी केलेल्या निवेदनातून मुख्यमंत्री यांना दिला आहे.
या निवेदनावर अनुश्री हिरदेवे, गणेश धांडे,आकाश नरवाडे, सिद्धार्थ धांडे,सचिन देशमुख,सतीश पंडित,दीपक पगारे यासह निवेदनावर १०० विध्यार्थ्यांच्या साह्य आहेत.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME