स्टेट बँकेच्या स्थापना दिनानिमित्त आरसेटीच्या वतीने वृक्षारोपण
वाशीम - भारतीय स्टेट बँकेच्या स्थापना दिनानिमित्त भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) च्या वतीने १ जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आरसेटी परिसरामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, सहाय्यक महाप्रबंधक नाबार्ड वाशिम विजय खंडारे, स्टेट बँक ट्रेजरी शाखेचे व्यवस्थापक मुंजाजी लोलगे, स्टेट बँक ईन टच चे अनिल राहुडकर, आरसेटी संचालक रघुनाथ निपाने, आरसेटी कर्मचारी वर्ग संजय खिल्लारी, आशिष राऊत, योगेश चव्हाण, महेंद्र सम्रत आदींची उपस्थिती लाभली. यावेळी मान्यवरांच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. आरसेटी वाशिम द्वारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बेरोजगार युवक युवतींकरिता विविध विषयांवर स्वयं रोजगार प्रशिक्षण मोफत आयोजित करण्यात येतात. ज्यामध्ये निवास आणि भोजन व्यवस्था पूर्णपणे विनामूल्य केली जाते. जिल्हातील जास्तीत जास्त युवक, युवतींनी आरसेटी मध्ये आयोजित होणार्या प्रशिक्षणामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME