Posts

Showing posts from March, 2022

भव्य मोफत नेत्र तपासणी व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर.

Image
  भव्य मोफत नेत्र तपासणी व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर रिसोड   :- (युगनायक  न्युज नेटवर्क )   रिसोड शहर व परिसरातील , सर्व गरजू नेत्र रुग्णांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, आपल्या रिसोड शहरांमध्ये, *स्वर्गीय भगवानराव अर्जुनराव गायकवाड(महागाव) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ*,  संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय नरसिंगराव बोडखे विद्यालय धोडप, तालुका रिसोड, व लायन्स क्लब रिसोड मीडटाऊन  आणि लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर, यांच्या संयुक्त विद्यमाने, भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे, आयोजन दिनांक १० एप्रिल २०२२ रोज रविवार व तपासणी दिनांक ८ एप्रिल २०२२ रोज शुक्रवार ला करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर येथील नेत्ररोग तज्ञ डॉक्टर हे मोफत नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया उपचार करणार आहेत. तेव्हा या सुवर्ण संधीचा रिसोड शहर व परिसरातील गरजू रुग्णांनी, या मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा हि नम्र विनंती.  या शिबिरामध्ये नाव नोंदणीसाठी संपर्क :  संतोष क्लॉथ सेंटर, सिविल लाईन रिसोड. ...

बेलखेडा येथील पोलीस पाटील माधव सावळे यांचा पोलीस स्टेशन शिरपुर येथे गौरव

Image
  बेलखेडा येथील पोलीस पाटील माधव सावळे यांचा पोलीस स्टेशन शिरपुर येथे गौरव               रिसोड :-   (भारत कांबळे प्रतिनिधी)    (युगनायक  न्युज नेटवर्क ) दिनांक ३१/3/२०२२ रिसोड तालुक्यातील बेलखेडा येथील. कतृत्ववान ढगायक व पोलीस पाटील माधव कुंडलीत सावळे. यांचा  जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह  यांचे मार्गदर्शना खाली. सुनील कुमार पुजारी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग वाशिम. यांचे प्रमुख उपस्थितीत. शिरपुर पोलीस स्टेशचे ठाणेदार  सुनील वानखेडे यांच्या हस्ते शिरपुर पोलीस स्टेशन मध्ये कार्यक्रमात प्रशस्तीपत्र देउन गौरव करण्यात आला. व शाल अंगावर पांघरूण सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना. वाशिम जिल्हा पोलीस दलाने आयोजित करण्यात आलेल्या संगीत संमेलनात आपन सहभागी झालात. आपले गीत केवळ गीत नव्हते. हे आपल्या गायनातून प्रचिती आले. तसेच आपल्या सांगीतिक योगदानामुळे. एकात्मता. बंधुता व आत्मीयता. वृदधिगत होईल. असा विश्वास वाटतो. करीता आपल्या अंतरंगातील सर्जनशील कलावंताचा हे प्रशस्तीपत्र देउन गौरव करीत आहोत. असे बोलताना शि...

आज सोनखास येथे राज्यस्तरीय धम्म परिषदेचे आयोजन

Image
  आज सोनखास येथे  राज्यस्तरीय धम्म  परिषदेचे आयोजन वाशिम  -(युगनायक  न्युज नेटवर्क ) भारतीय बौद्ध महासभा, आणि पंचशील मित्र मंडळ  सोनखासयांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय धम्म परिषदेचे आयोजन दि 30 मार्च ला करण्यात आले आहे या कार्यकामाला प्रामुख्याने उपस्थित पूज्य भन्ते डॉ  आनंद राहणार असून त्यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे  कार्यक्रमाचे  उदघाटक म्हणून डॉ विजयकुमार तुरुकमाने, तर अध्यक्ष स्थानी सिद्धार्थ देवरे स्वागताध्यक्ष  डॉ  वैशाली देवळे आणि हरिश्चंद्र पोफळे  (वाशिम जिल्हा संस्कार विभाग प्रमुख भा. बौ. महा. वाशिम असतील  कार्यक्रमाची  सुरवात सोनखास ता. जिल्हा वाशिम येथे सकाळी 9:00 वा ते रात्री 10:00 वा पर्यंत कार्यक्रमाचे  स्वरूप सकाळी 9:00 वा सामूहिक बुद्ध वंदना  आणि  महामानवच्या प्रतिमेचे पूजन ,9:30 वा. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आणि  सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत धम्मदेशना व्याख्यान दुपारी 2 वा 10 मी. चहा आणि उर्वरित कार्यक्रमाला सुरवात दुपारी 4 वा  अल्प उपहार राहील सायंकाळी 5 वा.ते 8 वा. भ...

धम्मसेनानी जी.एस.दादा कांबळे यांचा तृतीय स्मृतीदिना निमित्त जाहीर परिसंवाद संपन्न

Image
  धम्मसेनानी जी.एस.दादा कांबळे यांचा तृतीय स्मृतीदिना निमित्त जाहीर परिसंवाद  संपन्न नांदेड -(युगनायक न्यूज नेटवर्क )  सिडको...(दि.27..3.2022)रोजी ,सिडको येथे धम्मसेनानी,सत्यशोधक जी.एस. दादा कांबळे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने सिडको येथे जाहिर परिसंवाद आयोजन  करण्यात आले  होते ..प्रथम दादाच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करण्यात आला व जाहीर परिसंवादाला सुरवात करण्यात आली कार्यक्रमाचे  उदघाटक  पू. भंते पय्याबोधी  थेरो उपस्थित होते कार्यक्रमाचे  सभाध्यक्ष  म्हणून लक्ष्मीकांत शिंदे तर  प्रमुख पाहुणे म्हणून संजय कदम, आयु. रेखा दाभाडे, आनंद हनमंते, गोविंद वाघमारे  डी डी. गायकवाड प्रमुख उपस्थिती म्हणून अरुण कांबळे, भीमा वावळे तानाजी शिंदे, रंगनाथ भालेराव, होते तर  प्रमुख वक्ते म्हणून ऍड. बि एम. गायकवाड, आनंद दुधकवडे श्याम कांबळे विश्वनाथ उराडे म्हणून उपस्थित होते जाहीर  परिसंवादाचा विषय "जी.एस.दादा यांचे धम्मचळवळीत योगदान व आजची परिस्थिती" यावर सविस्तर विवेचन व मांडणी अॅड.एल.बीड.इंगळे ( बसपाचे महाराष्टृ प्रदेश सचिव...

पक्ष्यांसाठी चिमुकल्यांची धडपड! झाडांवर लावले जलपात्र :राष्ट्रीय हरित सेना एस एम सी इंग्लिश स्कूल, वाशीमचा उपक्रम

Image
  पक्ष्यांसाठी चिमुकल्यांची धडपड!  झाडांवर लावले जलपात्र  :राष्ट्रीय हरित सेना एस एम सी इंग्लिश स्कूल, वाशीमचा उपक्रम       वाशीम  -(युगनायक  न्यूज नेटवर्क ): स्थानिक एस एम  सी इंग्लिश स्कूल मध्ये राष्ट्रीय हरित सेनेच्या चिमुकल्यांनी प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनात पक्षांना रणरणत्या उन्हापासून संरक्षण आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी जलपात्राची उभारणी करण्यात आली  .           सध्या पृथ्वी वरील वाढते तापमान, झपाट्याने होत असलेले आधुनिकीकरण -यांत्रीकीकरण आणि निसर्गीचा दुष्परिणाम यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे  .सोबतच रासायनिक कीटकनाशकांच्या व खतांचा अति वापर यामुळे पक्षांची संख्या झपाट्याने कमी होत आहे त्यातच  मोबाईल चे टाँवर, इंटरनेटचा अतिवापर आणि त्यातुन निघणार्‍या लहरींचा फटका पक्षांना बसत आहे. प्रत्येक्षात दिसणारा पक्षी (चिमणी)  आता फक्त लहान मुलांना चित्रातच दिसण्याची वेळ आली आहे  .पक्षी हा निसर्गाचा अतिशय...

संस्कारक्षम, कार्यक्षम, चिकित्सक व चोखंदक बना-प्रा.यशवंत पवार

Image
  संस्कारक्षम, कार्यक्षम, चिकित्सक व चोखंदक बना-प्रा.यशवंत पवार मालेगांव / सुरज अवचार रासेयो स्वयंसेवकांनी अभ्यासूवृत्ती बाळगुण संस्कारक्षम, कार्यक्षम, चिकित्सक व चोखंदक बनण्याचे आवाहन प्रा. यशवंत पवार यांनी केले. ते रामराव झनक कला व वाणिज्य महा विद्यालय मालेगावच्या रासेयो विशेष भ्रमसंस्कार, शिबिर दत्तक ग्राम खिर्डा येथे रासेयो स्वयंसेवक व ग्रामस्थांना उद्देशून बोलत होते. रासेयोद्वारा आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी अनेक प्रवीय नात्मक खंजेरी भजन सादर करून उपस्थितांची मने जिंकून त्यांना मंत्रमुग्ध केले. ते पुढे म्हणाले की प्रत्येकाने आपल्या गावामध्ये एक छोटेसे ग्रंथालय उभारून व वाचनाची आवड अंगी बानुन स्पर्धा परीक्षेला सामोरे जाव व युवा पिढीवर व लहान मुलांवर वाचन संस्कार बिंबवावेत त्यानंतर मा. यशवंत पवार, सामाजिक कार्यकर्ते भारत इंगळे, वामनराव इंगळे यांनी संत सेवालाल महाराज, संत गाडगेबाब छ. शिवाजी महाराज, जिजाऊ माँ साहेब, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधानाची उद्देशपत्रिका इत्यादींच्या प्रतिमा स्वयंसेवकांना व ग्रामस्थांना भेट देवून त्यांना ...

ऑल इंडिया जमीयतुल कुरैश च्या जिल्हा मेळाव्यात शिक्षणावर भर. जो पर्यंत कुरैशी समाज शिक्षणाची कास धरत नाही तो पर्यंत समाज विकास करू शकत नाही. -- प्रा लुकमान कुरैशी

Image
  ऑल इंडिया जमीयतुल  कुरैश  च्या जिल्हा मेळाव्यात शिक्षणावर भर. जो पर्यंत कुरैशी समाज शिक्षणाची कास धरत नाही तो पर्यंत समाज विकास करू शकत नाही.  --  प्रा लुकमान कुरैशी मोताळा .( युगनायक न्यूज नेटवर्क ) आज दि.२७.०३.२०२२ रोजी अलफ्लाह इंग्लिश कॉन्व्हेन्ट मोताळा येथे ऑल इंडिया जमियतुल कुरैश  या सामाजिक संघटने चा जिल्हा मेळावा मोठ्या उत्साहाने जिल्हा अध्यक्ष प्रा लुकमान कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली अल फ्लाह इंग्लिश कॉन्व्हेन्ट मोताळा येथे यशस्वीपणे  पार पडला.सदर मेळ्याव्यात जिल्ह्यातील बह संख्येने मान्यवर उपस्थित होते.या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात कुरेशी समाजाच्या समस्या जसे शिक्षण, आरोग्य, लग्न व व्यवसाय बद्दल माहिती सांगण्यात आली.आपण सर्व एकत्रित येऊन ह्यावर उपाययोजना संघटन मार्फत पुर्ण करण्याचा प्रयत्न करु. याच दरम्यान जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली.व उर्वरित कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पुर्ण होईल. जिल्हा उपाध्यक्ष पदावर प्रा हुसेन कुरेशी मोताळा व मुजीब हसन अब्दुल हबीब कुरेशी मेहकर. यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्...

भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा रिसोड च्या वतीने दहा दिवसीय उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

Image
  भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा रिसोड च्या वतीने दहा दिवसीय उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन रिसोड (केशवनगर )  -  (युगनायक  न्युज नेटवर्क ) रमाई महिला संघ केशवनगर येथे दहा दिवसीय उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे आज दि. २४ मार्च २०२२ रोजी उद्घाटन करण्यात आले. उद्घाटक - संध्याताई पंडित जिल्हाध्यक्षा भारतीय बौद्ध महासभा, कार्यक्रमाच्या अध्यक्षा- महानंदाताई वाठोरे तालुका अध्यक्ष महिला, शिबिराच्या केंद्रीय शिक्षिका- चंद्रकला मुजमुले मॅडम, शिबिराच्या अध्यक्षा कांताबाई वाघमारे, प्रमुख उपस्थिती- शालिग्राम पठाडे सर तालुका अध्यक्ष व केंद्रीय शिक्षक भारतीय बौद्ध महासभा, देविदास सोनुने तालुका सचिव, कैलास सुर्वे तालुका संस्कार प्रमुख, गणेश कवडे गोवर्धन सर्कल प्रमुख, नितेश नवघरे बोध्दाचार्य, नंदकिशोर मोरे, अजय कांबळे समता सैनिक दल, शिवाजीराव सरनाईक सामाजिक कार्यकर्ते, शिवाजी दळवी सरपंच केशवनगर, गजानन बाजड उपसरपंच केशवनगर, भारत खंडारे सर, रवी वाघमारे सर, अशोक वाघमारे सर, प्रभाकर साबळे सर, नितिन डोंगरदिवे ग्रामपंचायत सदस्य, नितिन खंडारे आयोजक व उपस्थित सर्व रमाई महिला संघ केश...

आता महिलांनाही 6000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची मातृ वंदन योजना, लाभ घेण्यासाठी वाचा..

Image
आता महिलांनाही 6000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची मातृ वंदन योजना, लाभ घेण्यासाठी वाचा.. भारतात केंद्र सरकारकडून दुर्बल घटक, महिला आणि इतर काही घटकांच्या विकासासाठी अनके वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. देशभरात शेतकऱ्यांना जसे वर्षाला अनुदान म्हणून प्रत्येकी 6000 रुपये मिळतात. तसेच आता महिलांसाठीही केंद्र सरकारची एक अशी योजना आहे, ज्याद्वारे देशभरातील अनेक महिलांना आथिर्क लाभ मिळू शकतो. ही मदत आर्थिक स्वरूपात असणार आहे. महिलांसाठीच्या या योजनेचं नाव पीएम मातृ वंदन योजना (PMMVY Scheme) असं आहे. *पीएम मातृ वंदन योजनेचे फायदे काय?* भारत हा कृषीप्रधान देश असून अनेक कारणांमुळे देशातील शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते, हे आपल्याला माहीतच आहे. तसे आता काही गरीब महिलांनाही आर्थिक मदत म्हणून केंद्र सरकार 6000 रुपये देणार आहे. याचा फायदा देशातील लाखो महिलांना होणार असून या योजनेचा हवा तेवढा प्रसार न झाल्यामुळे अनेक महिला आताही या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे केंद्र सरकार पीएम मातृ वंदन योजना ही योजना अनेक उपक्रमांतर्गत महिलांपर्यंत पोहोचवत असते. ही योजना केवळ महिलांसाठी राबवली आहे. या योजनेच्या...

खासदार नवनीत राणा 'फायर' नव्हे 'लायर' काँग्रेस प्रदेश प्रवक्ते दिलीप एडतकर यांची टीका

Image
  खासदार नवनीत राणा 'फायर' नव्हे 'लायर' काँग्रेस प्रदेश प्रवक्ते दिलीप एडतकर यांची टीका अमरावती , - (युगनायक न्यूज नेटवर्क ) (ता. २१) : अमरावतीच्या भाजपप्रणीत खासदार नवनीत राणा यांनी फिल्मी स्टाईलमध्ये आपण 'फ्लॉवर' नाहीतर  'फायर' आहोत, असे म्हटले आहे. खरं बोलायचं झाल्यास त्या 'फायर' वगैरे काही नसून 'लायर' आहेत, अशी घणाघाती टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते एड. दिलीप एडतकर यांनी केली आहे. अमरावती मतदारसंघातील  अल्पसंख्यांक,  विमुक्त भटके , आंबेडकरी व इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसींशी त्या प्रचंड खोट्या बोलल्या व वागल्या आहेत. त्यामुळे मेळघाटात जाऊन भोळ्याभाबड्या आदिवासींच्या समूहात स्वतःला 'फायर' म्हणवून घेण्याचा नवनीत राणा यांचा फुकटचा मोठेपणा हास्यास्पद असल्याचे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन निवडणूक जिंकणाऱ्या नवनीत राणा यांनी लोकसभेत आपण ज्यांच्यातर्फे निवडून आलो, त्यांच्या पाठीमागे उभे न राहता चक्क भाजपच्या तंबूत घुसखोरी करून पहिला खोटेपणा ...

भाजपचे हिंदुत्व खोटारडे हेच सत्य आहे. खासदार संजय जाधव

Image
  भाजपचे हिंदुत्व खोटारडे हेच सत्य आहे. खासदार संजय जाधव लोणार. प्रा लुकमान कुरेशी   -(युगनायक  न्युज नेटवर्क ) भाजपचे हिंदुत्व केवळ भाषणापुरती मर्यादित असून हिंदू साठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्यास भाजप घरात बिळात लपते तर अशावेळी शिवसैनिकच रस्त्यावर उतरून हिंदुत्वाचे रक्षण करतात भाजपचे हिंदुत्व हे बेगडी आहे भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकू नय ते आमच्या रक्तात आहे असे रोखठोक मत परभणीचे खासदार संजय जाधव यांनी संपर्क अभियान दौऱ्यानिमित्त लोणारला आले असताना आपले मत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मेहकर विधानसभेचे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर शिवसेना जिल्हाप्रमुख प्राध्यापक बळीराम मापारी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाघ शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. आशाताई झोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष मापारी शिवसेना उपतालुका प्रमुख शिव पाटील तेजनकर बिरसा मुंडा संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान कोकाटे उपसभापती विठ्ठल नागरे भगवान पाटील सुलताने शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग सरकटे युवा सेना तालुका प्रमुख गजानन मापारी पंचायत समिती माजी उपसभापती हेमराज लाहोटी शिवस...

सावता सेना महाराष्ट्र राज्य बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी शिवदत्त राउत यांची निवड..

Image
 लोणार/प्रा लुकमान कुरेशी  सावता सेना महाराष्ट्र राज्य बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी शिवदत्त राउत यांची निवड.. (लोणार )    -युगनायक  न्युज नेटवर्क  लोणार शहरातील शिवदत्त राऊत यांचे समाज संघटन व समाजशील हे गुण पाहून संस्थापक अध्यक्ष मुंजाजी गोरे सावता सेना महाराष्ट्र राज्य यांनी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सावता सेना शिवदत्त राउत यांची निवड केली.समाज सेवेसाठी समाज संघटन हे ब्रीदवाक्य घेऊन सावता सेना महाराष्ट्रात विस्तार होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात संघटन मजबूत करण्यासाठी तसेच समाजातील दुर्घटना दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी ही संघटना काम करते.  शिवदत्त राऊत हे गेल्या दहा वर्षापासून सामाजिक व राष्ट्रीय कार्य करत आहे त्यांच्या या समाजकार्याबद्दल असलेली आवड व संघटन कार्यातील दीर्घ अनुभव याची दखल घेत सावता सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी यांची निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल  सावता महाराज वंशज ह.भ.प दादा महाराज वसेकर,रमेश महाराज वसेकर,रविकांत महाराज वसेकर,सावता सेना प्रदेश महासचिव विलास भुजबळ,प्रदेश सल्लागार ॲड.भागवत यादव,मयूर जाधव,रोहित मोरे,संतोष गाडे...

कलारत्न दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा २०२२" संपन्न

Image
कलारत्न दादासाहेब फाळके  पुरस्कार सोहळा २०२२" संपन्न नाशिक   (प्रतिनिधी )(युगनायक न्युज नेटवर्क )  शनिवार दिनांक 05/03/2022  रोजी वासळी  नाशिक येथे निगळ फिल्म प्रोडक्शन नाशिक तर्फे सायंकाळी ६ ते१० या वेळेत आयोजित करण्यात आलेला  "कलारात्न दादासाहेब फाळके  पुरस्कार सोहळा २०२२" संपन्न झाला या कार्यक्रमात अनेक  कलाकारांना पुरस्कार देण्यात आला या  कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून   लेखक-दिग्दर्शक :- माननीय श्री जितेंद्र जोहरी, निर्माता/दिग्दर्शक/अभिनेते :-माननीय श्री देवीदास निगळ,  दिग्दर्शक :- माननीय श्री राज भालेराव (शिर्डी), सातपूर पोलिस स्टेशन नाशिक येथील पोलीस अधिकारी माननीय  श्री महेंद्र चव्हाण सर,  माननीय श्री रमेश खांडबहाले  (उपसरपंच महिरावणी गाव),  हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन :- जागृती बांठीया यांनी उत्कृष्ट रित्या केले.  सर्व कार्यक्रमाचे नियोजन हे "निगळ फिल्म प्रोडक्शन" चे सर्वे सर्वा निर्माता/लेखक/दिग्दर्शक देविदास निगळ यांनी केले  तसेच  १) माननीय श्री जितेंद्...

अतिशय उत्साहाच्या वातावरणात शिवछत्रपतींचा भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण...

Image
  अतिशय उत्साहाच्या वातावरणात शिवछत्रपतींचा भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण... अमडापुर प्रतिनिधि  (युगनायक  न्युज नेटवर्क ) गेली ३५० वर्षांपासून इथल्या प्रत्येक माणसाला ज्यांनी स्वाभिमानाची प्रेरणा दिली, असे हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा अमडापुर येथे शिवस्मारक समिति यांच्या माध्यमातुन अमडापुर येथे उभारण्यात आला आहे.दि 21 मार्च 2022 ला ढोल पथकाच्या गजरात,फटाक्याच्या आतिशबाजी,नारी शक्तिचा तलवारबाजी,लाठी काठी,आखाडा, dj च्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 15 फुट पुतळ्याचे अनावरण करण्यात आले लोकार्पण रामभाऊ बगाडे हिंदुराज प्रतिष्ठाण अध्यक्ष यांच्या शुभहस्ते करण्यात आले. अप्रतिम जल्लोष पहावयास मिळाला अमडापुर  छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ज्याप्रमाणे अगदी थाटात  छत्रपतींचे आगमन झाले त्याप्रमाणेच रुबाबात आणि जल्लोषात अमडापूर मध्ये एवढा भव्य दिव्य कार्यक्रम होणे ही खरंच अभिमानाची बाब आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त शिवस्मारक समिति व सर्व शिवभक्तांनि परिश्रम घेतले या कार्यक्रमात अमडापुरचे ठाणेदार नागेश कुमार चतरकर,व त्य...

लोणार नगर परिषदेच्या वतीने ताले ठोको कार्यक्रमाची सुरुवात मोबाईल टॉवर सिल. टैक्स ना भरणाऱ्या कंपनीचे बेहाल.

Image
  लोणार नगर परिषदेच्या वतीने ताले ठोको कार्यक्रमाची सुरुवात मोबाईल टॉवर सिल. टैक्स ना भरणाऱ्या कंपनीचे बेहाल. युगनायक न्युज नेटवर्क  लोणार. प्रा लुकमान कुरेशी    लोणार  शहरातील ४ विविध मोबाईल कंपन्यांचे टावर सिल करण्यात आले.  काही कंपन्यांनी नियमांची पूर्तता न केल्याने व त्यांच्याकडे लाखो रुपयांची कराची थकबाकी असल्याने अश्या अनधिकृत मोबाईल टॉवर्सना सील करण्याची कारवाई लोणार नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्यधिकारी विठ्ठल केदारे यांनी केली. यामध्ये अनेक प्रमुख मोबाईल कंपन्यांच्या टाँवर्सना सील केले असून सदर कारवाईचे शहरात नगर परिषद चे महत्व सामान्य जनतेला  समजले असून. जास्तीत जास्त कार भरणा होईल. नगरपालिकेमध्ये नोंद असलेली टॉवर पैकी काही टॉवर अनाधिकृत आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता टावर उभारणी केली आहे व अनधिकृतरित्या वीज जोडणी घेतली आहे. अशा ४ टॉवर वर नगर परिषद मार्फत ही कारवाई करण्यात आली आहे. नगर परिषदने वारंवार सूचना देऊनही व कागदोपत्री व्यवहार करून ही कोणत्याही प्रकारची परवानगी त्यांनी घेतलेली नाही. या टॉवरवर तब्बल लाखो रुपयाची थकबाकी आह...

लोणार तालुक्यातील पळसखेड,हिरडव आणि जांभुळ येथील विटभटयांचा केला जाहीर लिलाव

Image
  लोणार तालुक्यातील पळसखेड,हिरडव आणि जांभुळ येथील विटभटयांचा केला जाहीर लिलाव लोणार. प्रा लुकमान कुरेशी  लोणार तालुक्यातील पळसखेड , हिरडव , जांबुळ शिवारात असणा - या अनधिकृत विटभटयावर लोणारचे तहसिलदार सैपन नदाफ यांनी आपल्या पथकासमवेत दिनांक 17/3/2022 रोजी कार्यवाही करून सदर विटभटटी मालक व शेतमालक यांना दिनांक 23/3/2022 पर्यंत केलेला दंड भरण्याची मुदत देण्यात आलेली होती . परंतू सदर विट भटटी मालक व शेतमालक यांनी सदर दंड विहीत मुदतीत न भरल्याने आज दिनांक 24 मार्च रोजी रोजी पळसखेड , हिरडव , जांबुळ येथील विटभटयांचा जाहीर लिलाव करण्यात आला . सदर लिलावाची पुर्वसुचना जाहीरनामा पुर्वी काढुन पुर्वसुचना संबंधित गावामध्ये देण्यात आलेली होती , सदर लिलावाचे वेळी हिरडव , पळसखेड व जांबुळ येथील विटटयांची एकुण दिलेल्या दंडाची रक्कम ही 3,55,104 रुपये होती . तर प्रत्यक्ष लिलावात सर्वोचच बोली बोलुन 4,29,000 रूपयांना लिलाव कायम करण्यात येऊन चलान द्वारे सदर रक्कमेचा भरणा करण्यात आला . य लिलाव धारक यांना विटांचा ताबा देण्यात आला . सदर कार्यवाही सैपन नदाफ तहसिलदार लोणार यांनी केलेली असुन त्यांचे सोबत प...

आ सौ श्वेताताई महाले सर्वोत्कृष्ट आमदार केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट आमदार 2022' पुरस्कार प्रदान

Image
  आ सौ श्वेताताई महाले सर्वोत्कृष्ट आमदार केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट आमदार  2022' पुरस्कार प्रदान दिल्ली  (युगनायक  न्युज नेटवर्क ) : सिक्स सिग्मा एक्सलन्स अवाॅर्ड हा आशियातील सर्वात मोठा पुरस्कारापैकी 'सर्वोत्कृष्ट आमदार - 2022' हा पुरस्कार आ सौ श्वेता ताई महाले यांना केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री मा. अनुरागजी ठाकूर यांच्या शुभहस्ते आज राजधानी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. सिक्स सिग्मा एक्सलन्स अवाॅर्ड हा आशियातील सर्वात मोठा पुरस्कार असून आज दि. 16 मार्च रोजी भारताचे पहिले माजी सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या स्मरणार्थ दिल्ली येथे हा भव्य पुरस्कार सोहळा संपन्न झाला.  लष्करप्रमुख मा. जनरल मनोज नरवणे या वेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मी विनम्रतेने माझ्या चिखली विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने या सन्मानाचा स्वीकार केला.           अत्यंत काटेकोर नामांकन प्रक्रिया, अंतर्गत व बाह्य अंकेक्षण, सखोल विश्लेषणाद्वारे सर्वोच्च ज्युरी मंडळाने माझ्या कार्यकर्तृत्वाचे मूल्यांकन करून हा पुरस्कार जाहीर केला ह...

वंचित बहुजन आघाडी च्या वर्धापन दिनानिमित्त चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप

Image
  वंचित बहुजन आघाडी  च्या वर्धापन दिनानिमित्त चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप बुलढाणा  (युगनायक न्युज नेटवर्क ) वंचित बहुजन आघाडी चिखली तालुक्याच्या वतीने तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त  श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी झंझावाती कार्य करण्यास  आम्हाला  स्वाभिमान ....... वंचित घटकांना सत्तेमध्ये पोचण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी चे रोपटे लावत आजच्या रोपट्याचा मोठा महावृक्ष झालेला दिसतोय   तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त काढलेल्या  आदेशानुसार तसेच जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ जाधव यांच्या सूचनेनुसार आमची वंचित बहुजन आघाडी वर्धापन दिनानिमित्त सामान्य रुग्णालय चिखली येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय अशोक सिंह सुरडकर साहेब तालुकाध्यक्ष संजय धुरंधर शहराध्यक्ष बाळा भाऊ भिसे बी एल खरात सुभेदार मेजर ऑर्नरी लेफ्टनंट यशवंत शिंगारे प्रदीप वाकोडे सिद्धार्थ गवई दादाराव जी वाकोडे मनोहर भाऊ घेवंदे सुमित भाऊ जाधव गजानन भाऊ खंदारे दीपक भाऊ गवई दीपक निकाळजे अविनाश भाऊ बोर्...

भारतीय वनसंवर्धन प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे

Image
  भारतीय वनसंवर्धन प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे भारत देशामधे " झाडे लावा झाडे जगवा " ही मोहीम खुप मोठ्या स्तरावर राबविण्यात आली . कारण करोडो वृक्ष निर्माण व्हावेत तसेच निसर्गाचा समतोल निर्माण व्हावा व त्यापासून ऑक्सीजन वायुचे प्रमाण वातावरणात दिवसेंदिवस कमी होत आहे . तसेच मानवी जीवन धोक्यात आलेले आहे . या करीता वृक्ष निर्माण करणे किती महत्वाचे आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे . निसर्गातील वातावरणामधील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ऑक्सीजन वायु या वायुची निर्मीती करण्यात वृक्षांचा सर्वात मोठा सहभाग असतो . एवढेच नव्हे तर कार्बन डाय ऑक्साइड वायु शोषुन घेण्याची क्षमता सुद्धा वृक्षा मधे असते म्हणून वृक्ष मानवी जीवनाकरीता अत्यंत उपयुक्त आहेत . परंतु मनुष्यप्राणी ईतका स्वार्थी झाला आहे की , त्याने आधुनिक विकासाच्या नावावर वृक्षाची कत्तल करणे सुरु केले आहे . मग तो विकास कोणत्याही स्वरुपाचा असो यापैकी एक महत्वाचे कारण कागद निर्मिति करीता सुद्धा झाडाची कत्तल केल्या जाते .अशा अनेक मोठमोठ्या शहरामधे विकासाच्या नावावर करोडो झाडे तोडली जात आहेत . मोठी वृक्ष शेकडो वर्ष जगतात त्यामुळे अनेक पिढ...

जागतिक चिमणी दिवस साजराचि मुकल्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करा

Image
  जागतिक चिमणी दिवस साजराचि मुकल्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करा   भारतीय बौद्ध महासभेचे आव्हान     वाशिम (प्रतिनिधी ) युगनायक न्यूज नेटवर्क  ज्यांच्या कडे सोई नाही असे काही कुटुंब अन्न, पाण्यासाठी या शहरातुन त्या शहरात भटकंती करतात.तशा चिमण्या सुध्दा गायब झाल्या आहेत करिता चिमणी वाचविण्यासाठी चिमुकल्यांना दाना , पाण्याची सोय करुन आसरा दया असे जागतिक  चिमणी दिवस साजरा करतांना जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ भगत यांनी आव्हान केले आहे.  आज जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने स्थानीक विहारात भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा मार्फत  २० मार्च रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ह्यावेळी महाड क्रांती दिवस व समता सैनिक दल स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे  ह्यावेळी हरिश्चंद्र जी पोफळे (संस्कार विभाग प्रमुख), गोविंदराव इंगळे (जिल्हा कोषाध्यक्ष) संध्याताई पंडित (महिला विभाग प्रमुख), दिलीप गवई (जिल्हा कार्या.सचिव), पंढरी खिल्लारे (जिल्हा सचिव), हर्षल इंगोले (जिल्हा सचिव), पि,के भगत सर (जिल्हा संघटक), सुमन ताजने ( केंद्रीय शिक्षीका) इंदुमती जांभरुणकर (कें...

कोयाळी ( बोरकर ) येथे दहा दिवसीय उपासिका धम्मप्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

Image
  कोयाळी ( बोरकर ) येथे दहा दिवसीय उपासिका धम्मप्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन                रिसोड - विशेष प्रतिनिधी  (युगनायक न्युज नेटवर्क ) भारतीय बौद्ध महासभेच्या वतिने ग्राम शाखा कोयाळी येथे   उपासिका धम्मप्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन  तालुका सचिव देविदास सोनुने यांच्या हस्ते झाले.  कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे  प्रथम मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्रिशरण पंचशील घेण्यात आले.  तर प्रमुख मार्गदर्शक कैलास सुर्वे तालुका संस्कार प्रमुख हे होते    दहा दिवस उपासिकांना धम्मप्रशिक्षिका चंद्रकला मुजमुले ताई  ठाणे  ह्या आहेत.बुद्ध चरित्र, बाबासाहेब चरित्र,धम्मनायिका चरित्र, बावीस प्रतिज्ञा,इत्यादी माहिती सांगणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित   गणेश कवडे गोवर्धन सर्कल प्रमुख नितीन खंडारे वंचित बहुजन आघाडीचे निष्ठावंत कार्यकर्तेप्रवीन गायकवाड नितेश झरे, बालाजी बळीराम कळंबे,, छगन सुदामा खिल्ल...

प्रथम अतिक्रमण नियमाकुल करा -तेव्हाच घरकुल योजनेचा लाभ द्या -बेघर गोरगरीबाची मागणी

Image
प्रथम अतिक्रमण नियमाकुल करा -तेव्हाच घरकुल योजनेचा लाभ द्या -बेघर गोरगरीबाची मागणी     रिसोड :--दिनांक २0 (भारत कांबळे प्रतिनिधी )                रिसोड तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण खेडेगावातील रमाई घरकुल योजनेत. पात्र व गरजु लोकांची नावे प्रपत्र ड यादीमध्ये समाविष्ट असली तरी. अनेक बेघर कुंटुबाची अतीक्रमने असल्याने. हे लाभार्थी घरकुला पासुन वंचित राहतात की काय? असा प्रश्न बेघर गोरगरीब भुमीहिन शेतमजुर महिलांना सतावत आहे. तरी शासनाने  प्रथम लाभार्थ्यांच्या नावे अतीक्रमने नियमाकुल करावीत. व त्यांनाच घरकुल योजनेचा लाभ घ्यावा. अशी मागणी बेघर गोरगरीब भुमीहिन शेतमजुर कुंटुबिया कडुन होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रिसोड तालुक्यातील रिठद जिल्हा परिषद गटातील बेलखेडा. पार्डीतिखे. हिवरापेन.वरुडतोफा.कोयाळी.आसेगावपेन. खडकी ढिगारे. येवती. रिठद   अशा अनेक गावात  दलीत वस्ती. झोपडपट्टी. अल्पभूधारक शेतकरी. गोरगरीब. भुमीहिन. शेतमजुर कच्च्या घरामध्ये वास्तव्य करून. आपले जीवन जगत आहेत. यांची नावे रमाई घरकुल योजना. व पंतप्रधान आवास योजना या...

"श्री शिवाजी डी.एड काँलेज वाशिम चा आंतरवासिकता समारोपीय कार्यक्रम संपन्न"

Image
 "श्री शिवाजी डी.एड काँलेज वाशिम चा आंतरवासिकता समारोपीय कार्यक्रम संपन्न" मालेगांव / सुरज अवचार (युगनायक न्युज नेटवर्क ) मौजे वाळकी येथे जि. प. प्राथमिक शाळेमध्ये दहा दिवस श्री शिवाजी डी . एल .एड .  आंतरवासिता शिबीर पार पडले. सर्व प्राध्यापक छात्राध्यापक सर्व शिक्षक रुंद यावेळी उपस्थित होते, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी  श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अरुणरावजी सरनाईक सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रा. मोरे सर (ज्येष्ठ अधिव्याख्याते जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वाशिम ) श्री, सतीश शिंदे सर ( मुख्यध्यापक प्राथमिक शाळा, वाळकी ) यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली तर, प्रा.देशमुख मॅडम ( प्रशासकीय अधिकारी ) श्री. गजानन भाऊ भुरभुरे ( पं स सदस्य वाशिम ) श्री. विनोद नंदापुरे ( अध्यक्ष शाळा समिती वाळकी ) श्रीराम कांबळे, सौ. शितल डव्हळे ( सरपंच वाळकी ) श्री. रोकडे सर यांची उपस्थिती यावेळी होती प्रा. पाटील मॅडम,प्रा. खुरसडे मॅडम प्रा. बेदरकर मॅडम यांची मार्गदर्शिका म्हणून उपस्थिती लाभली,  सर्व छात्राध्यापक - छात्राध्यापिका यांची शिस्त विनयशिलता - उ...

सम्राट अशोक सेना च्या वतीने १०/ १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी हितासाठी छेडणार आंदोलन

Image
  सम्राट अशोक सेना च्या वतीने  १०/ १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी  हितासाठी  छेडणार आंदोलन अकोला दि.१५/मार्च २०२२ रोजी अकोला शिक्षण अधिकारी कार्यालय येथे,तिथल्या काही कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितले की,आम्ही निवेदन घेणार नाही कोणीही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे,आम्हाला आक्रमकांची भूमिका घेवावे लागली,नंतर सर्व अधिकारी वर्ग हजर झाले त्यांना आम्ही निवेदन देऊन,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होत असलेल्या वाहनाच्या अडचणीमुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे याकरिता निवेदन दिले,सध्या चालू असलेले दहावीचे व बारावीचे पेपर देणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना,अतिशय अडचणीचा सामना करण्याची परिस्थिती निर्माण झाली,सहा महिन्यापासून महाराष्ट्रातील प्रत्येक एसटी महामंडळ च्या कर्मचाऱ्यांचे संप चालू आहे,संपत चालू असताना अशा परिस्थितीत,दहावी आणि बारावीचे पेपर चालू आहेत,हे पेपर सध्या ऑफलाईन पद्धतीने शाळेमध्ये घेण्याचे ठरवले परंतु काही भागातील एसटी बस उपलब्ध नसल्यामुळे,विद्यार्थ्यांना खाजगी वाहनांमध्ये प्रवास करावा लागत आहे,या प्रवासाचा विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे,ख...

स्वच्छतागृह, वॉटरफिल्टर डिजिटल क्लासरूम मागणीसाठी जि प सदस्य श्री. मोहन चौधरी यांना शाळा व्यवस्थापन समिती भट उमरा यांनी दिले निवेदन

Image
  स्वच्छतागृह, वॉटरफिल्टर डिजिटल क्लासरूम मागणीसाठी जि प सदस्य श्री. मोहन चौधरी यांना शाळा व्यवस्थापन समिती भट उमरा यांनी दिले निवेदन वाशिम प्रतिनिधी (युगनायक  न्युज नेटवर्क ) वाशिम  तालुक्यातील भट उमरा :जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथ शाळा भट उमरा शाळेत विविध सुविधा प्राप्त व्हाव्या हा उदात्त हेतू ठेवून  स्वच्छता गृह, डिजिटल क्लासरूम, वॉल कंपाउंड उंची वाढवणे, वॉटर फिल्टर या विविध कामासाठी जिल्हा परिषदेचे कार्यशील सदस्य मा.मोहनराव चौधरी  यांना भटउमरा येथील शाळा व्यवस्थापन समिती च्या वतीने निवेदन देण्यात आले. शाळेला शासना मार्फत भौतिक सुविधा प्राप्त व्हाव्या व विध्यार्थ्याची मानसिकता चांगली रहावी शाळेत सर्व सोयी सुविधा असल्यास विध्यार्थ्यात शाळेविषयी आवड निर्माण होते.या हेतूने हे निवेदन दिले.यावेळी श्री.हरिभाऊ काळे, अध्यक्ष ,विनोद इंगळे उपाध्यक्ष, राजाराम काळे, विजय काळे सदस्य गणेश काळे,गणेश काळे, सदस्य  शंकर राजगुरू, भरत काळे,गणेश इंगोले, रामहरी घनेर, गोलु काळे हजर होते.

केशव नगर ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिला दिन साजरा

Image
केशव नगर  ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिला दिन साजरा  रिसोड -(युगनायक न्यूज नेटवर्क )  केशव नगर ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला आहे यावेळी उपस्थित रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमितभाऊ  झनक यांच्या सुविध पत्नी सौ प्रितीताई झनक यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जिल्हा कृषी अधिकारी श्री टोटावर साहेब रिसोड पंचायत समिती सभापती केशरताई हाडे उपसभापती सुभाष पाटील खरात , महिला बालकल्याण अधिकारी केवटकर मॅडम  कंकाळ साहेब केशव नगर चे शिवाजीराव सरनाईक सरपंच जरीता दळवी, उपसरपंच गजानन बाजड सदस्य मोहिनी ताई डोंगरदिवे, त्रिवेणी ताई पुरी अंगणवाडी सेविका व मदतनीस हजर होत्या यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन बाजड उपसरपंच यांनी केले

मनोजभाऊ दांडगे आयोजित भव्य महाआरोग्य शिबिराला प्रचंड प्रतिसाद

Image
  मनोजभाऊ दांडगे आयोजित भव्य महाआरोग्य शिबिराला प्रचंड प्रतिसाद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न,1500 रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ गेल्या चार वर्षातील 5 वे आरोग्य शिबीर संपन्न झाल्याचा आनंद,राजकीय जुमलेबाजी म्हणून नाहीतर सातत्यपूर्ण रुग्णसेवा करणे हे कर्तव्य समजतो:-मनोज दांडगे मासरूळ सर्कल मध्ये मनोजभाऊ दांडगे हेच जनतेचे खरे सेवक:-निलेश देठे जामठी : -(युगनायक न्यूज नेटवर्क ) (ता 27 फेब्रुवारी) बुलढाणा जिल्ह्याचे पालक मंत्री माननीय *नामदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष माननीय नाझेर काझी साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलढाणा जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक माननीय रवींद्रजी तौर साहेब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कामगार सेल माननीय *श्री मनोज भाऊ दांडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज* यांच्या जयंतीचे औचित्य साधत मासरूळ जिल्हा परिषद सर्कल मध्ये भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन ज्ञानदेवराव बापु द...