"श्री शिवाजी डी.एड काँलेज वाशिम चा आंतरवासिकता समारोपीय कार्यक्रम संपन्न"
"श्री शिवाजी डी.एड काँलेज वाशिम चा आंतरवासिकता समारोपीय कार्यक्रम संपन्न"
मालेगांव / सुरज अवचार (युगनायक न्युज नेटवर्क )
मौजे वाळकी येथे जि. प. प्राथमिक शाळेमध्ये दहा दिवस श्री शिवाजी डी . एल .एड . आंतरवासिता शिबीर पार पडले. सर्व प्राध्यापक छात्राध्यापक सर्व शिक्षक रुंद यावेळी उपस्थित होते,
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अरुणरावजी सरनाईक सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रा. मोरे सर (ज्येष्ठ अधिव्याख्याते जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वाशिम ) श्री, सतीश शिंदे सर ( मुख्यध्यापक प्राथमिक शाळा, वाळकी ) यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली तर, प्रा.देशमुख मॅडम ( प्रशासकीय अधिकारी ) श्री. गजानन भाऊ भुरभुरे ( पं स सदस्य वाशिम ) श्री. विनोद नंदापुरे ( अध्यक्ष शाळा समिती वाळकी ) श्रीराम कांबळे, सौ. शितल डव्हळे ( सरपंच वाळकी ) श्री. रोकडे सर यांची उपस्थिती यावेळी होती प्रा. पाटील मॅडम,प्रा. खुरसडे मॅडम प्रा. बेदरकर मॅडम यांची मार्गदर्शिका म्हणून उपस्थिती लाभली,
सर्व छात्राध्यापक - छात्राध्यापिका यांची शिस्त विनयशिलता - उत्साह मेहनत वाखाणण्याजोगी होती. सर्व शिक्षकांना हा उत्साह नक्कीच प्रेरणादायी - व विध्यार्थी यांच्या मनात नवचैतन्य निर्माण करेल हे निश्चित .
या दहा दिवसात जि. प प्राथमिक शाळा वाळकी येथील विद्यार्थ्यांना नाविन्य दिसले . सर्जनशिलता भरपूर कृतीयुक्त अध्ययनास वाव मिळाला . अध्ययनात रुची निर्माण झाली .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. भारती देशमुख मॅडम यांनी केले,त्यात समारोपीय सुसंवादात्मक भाषणातून आरु सर यांनी दोन चार छोट्या समयोचित कविता सादर केल्या . त्याने जवळपास सर्वच भारावून गेले . श्री शिवाजी डी एड कॉलेज वाशिम च्या छात्राध्यापक व छात्राध्यापीका यांनी जिल्हा परिषद प्राथमिक वरिष्ठ शाळा वाळकी यांना थोर क्रांतीकारक भगतसिंग यांची चा फोटो भेटवस्तू म्हणून दिला.प्राचार्य तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये सर्व छात्राध्यापक व छात्राध्यापीका यांचे कौतुक केले. त्यांनी सर्व छात्राध्यापक विद्यार्थ्यांना समयोचित भविष्य काळाची पावले ओळखून वाटचाल करण्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.त्यानंतर श्री. आरु सर यांनी आपल्या मनोगतातून जीवनात केवळ एकच मार्ग - एखादी नोकरी असे लक्ष - ध्येय न ठेवता सर्वांगीण सारासार विचार घेण्यासाठी सर्व आकाश खुले असल्यागत वाटचाल करावी व जीवनात यशस्वी व्हावे असा मोलाचा संदेश दिला. बऱ्याच अध्यापक विध्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. भावी शिक्षकांना प्रत्यक्ष शिकवण्याचा अनुभव मिळण्यासाठी चा आंतरवासिता शिबिर या उपक्रमा दरम्यान सर्व छात्राध्यापक व छात्राध्यापीका यांनी यादरम्यान विविध शैक्षणिक साहित्य वापरून पाठ घेतले. तसेच शारीरिक शिक्षण,कार्यानुभव व विविध खेळ घेऊन विद्यार्थ्यांना शिकवले. आंतरवासिता शिबिरादरम्यान छात्राध्यापक यांनी विविध स्पर्धा घेतल्या आणि या स्पर्धेचे बक्षीस वितरण सुद्धा समारोप समारंभामध्ये मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन - कु.प्राची नागरे,कु. माधुरी गेबल यांनी केले आभारप्रदर्शन अमोल कव्हर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री शिवाजी अध्यापक विद्यालयाचे सर्व छात्राध्यापक व छात्राध्यापीका या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले .
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME