भारतीय वनसंवर्धन प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे
भारतीय वनसंवर्धन प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे
भारत देशामधे " झाडे लावा झाडे जगवा " ही मोहीम खुप मोठ्या स्तरावर राबविण्यात आली . कारण करोडो वृक्ष निर्माण व्हावेत तसेच निसर्गाचा समतोल निर्माण व्हावा व त्यापासून ऑक्सीजन वायुचे प्रमाण वातावरणात दिवसेंदिवस कमी होत आहे . तसेच मानवी जीवन धोक्यात आलेले आहे . या करीता वृक्ष निर्माण करणे किती महत्वाचे आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे . निसर्गातील वातावरणामधील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ऑक्सीजन वायु या वायुची निर्मीती करण्यात वृक्षांचा सर्वात मोठा सहभाग असतो . एवढेच नव्हे तर कार्बन डाय ऑक्साइड वायु शोषुन घेण्याची क्षमता सुद्धा वृक्षा मधे असते म्हणून वृक्ष मानवी जीवनाकरीता अत्यंत उपयुक्त आहेत . परंतु मनुष्यप्राणी ईतका स्वार्थी झाला आहे की , त्याने आधुनिक विकासाच्या नावावर वृक्षाची कत्तल करणे सुरु केले आहे . मग तो विकास कोणत्याही स्वरुपाचा असो यापैकी एक महत्वाचे कारण कागद निर्मिति करीता सुद्धा झाडाची कत्तल केल्या जाते .अशा अनेक मोठमोठ्या शहरामधे विकासाच्या नावावर करोडो झाडे तोडली जात आहेत . मोठी वृक्ष शेकडो वर्ष जगतात त्यामुळे अनेक पिढ्यांना ते शुद्ध वातावरण निर्माण करण्यास मदत करतात . याच माध्यमातून मी आपणास सांगू इच्छितो की ,कागद निर्मिती करीता असंख्य झाडाच्या कत्तली केल्या जातात यावर सर्वानी विचार करण्याची वेळ आलेली आहे . भारतातील सर्व राज्यामध्ये शासकीय अथवा निमशासकीय कार्यालये त्याचप्रमाणे न्यायालयीन दैनंदिन कामकाज करीता तसेच शैक्षणिक क्षेत्रामधे सुद्धा पेपरचा खुप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो . बऱ्याच वेळेस अत्यंत छोट्या कारणाकरिता देखील अर्ज दाखल करावा लागतो . जे काम तोंडी स्वरुपात देखील पूर्ण होऊ शकते अशा वेळेस अर्जाची मागणी न करता तोंडी विनंती वरुन बरेचशी कामे होऊ शकतात यामुळे कागदाचा निरर्थक वापर टाळला जाऊ शकतो पर्यायाने वृक्षांची कत्तल थांबविन्यास मोठ्या स्तरावर मदत होईल . शालेय शिक्षणापासून ते उच्च माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची पुस्तकांची गरज असते दरवर्षी शिक्षणाकरीता नविन पुस्तके विद्यार्थ्यांना विकत घेण्यास सांगितले जाते तसा दबाव असंख्य शाळेच्या विद्यार्थ्यावर दिसून येतो . शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा असेल तर सर्वात पहिले पुस्तकांचा खर्च विद्यार्थ्यांना परवडेल एवढा असावा किंवा मी असे सुच वेन की , प्रत्येक शाळेने इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके द्यावित . त्यांनी दिलेली पुस्तके काळजी पूर्वक विद्यार्थ्यांनी शाळेला परत करावी जेनेकरुण त्यांच्या मागून येणारा गरीब होतकरु विद्यार्थी त्या पुस्तकांचा उपयोग करू शकेल अशा प्रकारे प्रत्येक शाळेनी हा उपक्रम राबवावा . वरच्या वर्गातील विद्यार्थांची पुस्तके खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांना दिल्याने नविन पुस्तके घेण्याची गरज पडणार नाही .तसेच नविन पुस्तक निर्मिती करीता वृक्ष तोडली जाणार नाही यामुळे वृक्षांचे सरक्षण होईल . तसे वुक्ष तोडी ला आळा बसेल व ज्या वृक्षांच महत्व पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून शाळेत शिकविल्या जाते ते प्रत्येक्ष कृतीतुन अमलात आणल्या जाईल. वृक्षामुळे मिळणाऱ्या ऑक्सीजन वायुचे प्रमाण वातावरणात वाढू शकेल व् कार्बन डाय ऑक्साइड वायुचा धोका कमी निर्माण होईल तसेच पुस्तके बनवीन्याकरीता करोडो रुपये खर्च केल्या जातात व विद्यार्थांच्या पालकांवर नविन पुस्तके घेण्याच्या नावावर वसूल केल्या जातात हे समीकरण कोठेतरी थांबले पाहिजे . सर्वात महत्वाचे म्हणजे अमेरिका हा देश विकसीत राष्ट्र आहे या देशात वृक्षांच्या संरक्षणा करीता सर्व स्तरातील शालेय विद्यार्थ्यां करीता हा उपक्रम राबविला जातो यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तके विकत घेण्याची गरज नाही . शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुस्तके दिल्या जातात व विद्यार्थ्यांना त्याचे महत्त्व समजावून सांगितल्या जाते . भारत देशामधे प्रत्येक राज्यात जर हा शालेय पुस्तकांचा उपक्रम राबविल्या गेला तर करोडो वृक्षाचे सरंक्षण होईल व पुस्तकांवर होणारा खर्च वाचविता येईल या माध्यमातून वृक्षांची होणारी कत्तल थांबेल . भारत देशामधे एक नविन क्राँति निर्माण होईल ज्यामुळे विद्यार्थ्यां मध्ये वृक्ष संरक्षणा करिता जागृति निर्माण होईल तसेच प्रत्येकाच्या कृतितुन ... " स्वच्छ ग्राम हरित ग्राम " ही संकल्पना राबविणे गरजेचे आहे यामुळे वातावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल . माझ्यामते सर्वानी याचा गांभीर्याने विचार करावा एवढेच अपेक्षित आहे धन्यवाद !
आपल्या सर्वांचा प्रा . ऍड. गजेन्द्र सरपाते
ईमेल g.1sarpate@gmail.com
Mob.9923539171
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME