बेलखेडा येथील पोलीस पाटील माधव सावळे यांचा पोलीस स्टेशन शिरपुर येथे गौरव
बेलखेडा येथील पोलीस पाटील माधव सावळे यांचा पोलीस स्टेशन शिरपुर येथे गौरव
रिसोड:- (भारत कांबळे प्रतिनिधी)
(युगनायक न्युज नेटवर्क )दिनांक ३१/3/२०२२ रिसोड तालुक्यातील बेलखेडा येथील. कतृत्ववान ढगायक व पोलीस पाटील माधव कुंडलीत सावळे. यांचा जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांचे मार्गदर्शना खाली. सुनील कुमार पुजारी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग वाशिम. यांचे प्रमुख उपस्थितीत. शिरपुर पोलीस स्टेशचे ठाणेदार सुनील वानखेडे यांच्या हस्ते शिरपुर पोलीस स्टेशन मध्ये कार्यक्रमात प्रशस्तीपत्र देउन गौरव करण्यात आला. व शाल अंगावर पांघरूण सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना. वाशिम जिल्हा पोलीस दलाने आयोजित करण्यात आलेल्या संगीत संमेलनात आपन सहभागी झालात. आपले गीत केवळ गीत नव्हते. हे आपल्या गायनातून प्रचिती आले. तसेच आपल्या सांगीतिक योगदानामुळे. एकात्मता. बंधुता व आत्मीयता. वृदधिगत होईल. असा विश्वास वाटतो. करीता आपल्या अंतरंगातील सर्जनशील कलावंताचा हे प्रशस्तीपत्र देउन गौरव करीत आहोत. असे बोलताना शिरपुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील वानखेडेनी आपल्या मनोगतात सांगीतले. बेलखेडा येथील गावकऱ्यांनी माधव सावळे यांचा गौरव केला. या कार्यक्रमात अनेक गायकांचा सत्कार करण्यात आला.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME