आ सौ श्वेताताई महाले सर्वोत्कृष्ट आमदार केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट आमदार 2022' पुरस्कार प्रदान
आ सौ श्वेताताई महाले सर्वोत्कृष्ट आमदार
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट आमदार 2022' पुरस्कार प्रदान
दिल्ली (युगनायक न्युज नेटवर्क ): सिक्स सिग्मा एक्सलन्स अवाॅर्ड हा आशियातील सर्वात मोठा पुरस्कारापैकी 'सर्वोत्कृष्ट आमदार - 2022' हा पुरस्कार आ सौ श्वेता ताई महाले यांना केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री मा. अनुरागजी ठाकूर यांच्या शुभहस्ते आज राजधानी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.सिक्स सिग्मा एक्सलन्स अवाॅर्ड हा आशियातील सर्वात मोठा पुरस्कार असून आज दि. 16 मार्च रोजी भारताचे पहिले माजी सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या स्मरणार्थ दिल्ली येथे हा भव्य पुरस्कार सोहळा संपन्न झाला. लष्करप्रमुख मा. जनरल मनोज नरवणे या वेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
मी विनम्रतेने माझ्या चिखली विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने या सन्मानाचा स्वीकार केला.
अत्यंत काटेकोर नामांकन प्रक्रिया, अंतर्गत व बाह्य अंकेक्षण, सखोल विश्लेषणाद्वारे सर्वोच्च ज्युरी मंडळाने माझ्या कार्यकर्तृत्वाचे मूल्यांकन करून हा पुरस्कार जाहीर केला होता.सिक्स सिग्मा एक्सलन्स अवाॅर्डस अँड लीडरशिप समिट 2022 चे आयोजक अध्यक्ष डाॅ. प्रदीप भारद्वाज यांनी पुरस्काराविषयी पाठवलेल्या पत्रात म्हटले होते की, "समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा आपला ध्यास कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी त्याच्या प्रतिक्रिया देताना काढले.
"हा नागरिकांचा सन्मान"
जनतेने मला सेवा करण्याची संधी दिली . त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे. त्यांच्या अडीअडचणीत सुख दुःखात सहभागी होता आले / येत आहे हे माझे भाग्य आहे.
त्यामुळे हा सन्मान माझ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा असून हा पुरस्कार मी जनतेलाच अर्पण करते अशी प्रतिक्रिया आ सौ श्वेता ताई महाले यांनी यावेळी दिली
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME