ऑल इंडिया जमीयतुल कुरैश च्या जिल्हा मेळाव्यात शिक्षणावर भर. जो पर्यंत कुरैशी समाज शिक्षणाची कास धरत नाही तो पर्यंत समाज विकास करू शकत नाही. -- प्रा लुकमान कुरैशी
ऑल इंडिया जमीयतुल कुरैश च्या जिल्हा मेळाव्यात शिक्षणावर भर. जो पर्यंत कुरैशी समाज शिक्षणाची कास धरत नाही तो पर्यंत समाज विकास करू शकत नाही. -- प्रा लुकमान कुरैशी
मोताळा.( युगनायक न्यूज नेटवर्क ) आज दि.२७.०३.२०२२ रोजी अलफ्लाह इंग्लिश कॉन्व्हेन्ट मोताळा येथे ऑल इंडिया जमियतुल कुरैश या सामाजिक संघटने चा जिल्हा मेळावा मोठ्या उत्साहाने जिल्हा अध्यक्ष प्रा लुकमान कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली अल फ्लाह इंग्लिश कॉन्व्हेन्ट मोताळा येथे यशस्वीपणे पार पडला.सदर मेळ्याव्यात जिल्ह्यातील बह संख्येने मान्यवर उपस्थित होते.या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात कुरेशी समाजाच्या समस्या जसे शिक्षण, आरोग्य, लग्न व व्यवसाय बद्दल माहिती सांगण्यात आली.आपण सर्व एकत्रित येऊन ह्यावर उपाययोजना संघटन मार्फत पुर्ण करण्याचा प्रयत्न करु. याच दरम्यान जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली.व उर्वरित कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पुर्ण होईल. जिल्हा उपाध्यक्ष पदावर प्रा हुसेन कुरेशी मोताळा व मुजीब हसन अब्दुल हबीब कुरेशी मेहकर. यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्हा सचिव म्हणुन शेख इरफान खलील कुरेशी मोताळा व शेख ज़ाहेद हम्ज़ा कुरैशी मेहकर यांना जबाबदारी देण्यात आली. तसेच मोताळा तालुका अध्यक्ष शेख शकील गोंडु कुरेशी,शेगाव तालुका अध्यक्ष अब्दुल जब्बार कुरेशी यांची निवड करण्यात आली. रफीक खा नथ्थे खा कुरेशी यांना मोताळा शहर अध्यक्ष पद देण्यात आले. युथ विंग मध्ये शेख शहेबाज हमीद कुरेशी यांची मोताळा तालुका व शेख इरफान याकुब कुरेशी यांची शहर अध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली. तसेच शेख चांद कासम कुरेशी नगर सेवक शेगाव यांची जळगाव जामोद विधान सभा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली सर्व नवीन जिल्हा कार्यकारिणीत नव निर्वाचित मान्यवरांनी नियुक्ती पत्र जिल्हा अध्यक्ष प्रा लुकमान कुरेशी यांच्या हस्ते देण्यात आले. व सर्वांचा सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. सदर मेळ्याव्यात मोईन हाजी रफीक कुरेशी,हबीब कुरेशी,जाबीर कुरेशी,शकील जलील कुरेशी,अकील कुरेशी,शेख इरफान अब्दुल रहीम कुरैश लोणार. अब्दुल अज़ीज़ शेख चांद कुरैशी महेकर.,करीम पाशा,रफीक कुरेशी इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.या वेळी मोताळा कुरैशी समाजाच्या वतीने प्रा लुकमान कुरैशी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा हुसेन कुरेशी यांनी तर आभार प्रदर्शन इरफान कुरेशी यांनी केले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME