संस्कारक्षम, कार्यक्षम, चिकित्सक व चोखंदक बना-प्रा.यशवंत पवार
संस्कारक्षम, कार्यक्षम, चिकित्सक व चोखंदक बना-प्रा.यशवंत पवार
मालेगांव / सुरज अवचार
रासेयो स्वयंसेवकांनी अभ्यासूवृत्ती बाळगुण संस्कारक्षम, कार्यक्षम, चिकित्सक व चोखंदक बनण्याचे आवाहन प्रा. यशवंत पवार यांनी केले. ते रामराव झनक कला व वाणिज्य महा विद्यालय मालेगावच्या रासेयो विशेष भ्रमसंस्कार, शिबिर दत्तक ग्राम खिर्डा येथे रासेयो स्वयंसेवक व ग्रामस्थांना उद्देशून बोलत होते. रासेयोद्वारा आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी अनेक प्रवीय नात्मक खंजेरी भजन सादर करून उपस्थितांची मने जिंकून त्यांना मंत्रमुग्ध केले. ते पुढे म्हणाले की प्रत्येकाने आपल्या गावामध्ये एक छोटेसे ग्रंथालय उभारून व वाचनाची आवड अंगी बानुन स्पर्धा परीक्षेला सामोरे जाव व युवा पिढीवर व लहान मुलांवर वाचन संस्कार बिंबवावेत त्यानंतर मा. यशवंत पवार, सामाजिक कार्यकर्ते भारत इंगळे, वामनराव इंगळे यांनी संत सेवालाल महाराज, संत गाडगेबाब छ. शिवाजी महाराज, जिजाऊ माँ साहेब, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधानाची उद्देशपत्रिका इत्यादींच्या प्रतिमा स्वयंसेवकांना व ग्रामस्थांना भेट देवून त्यांना प्रेरित करून कार्यप्रवण बनविले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत इंगळे हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम प्रा. डॉ. शिमराव जांगुरूणकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रियंका जमघाइने तर आभारप्रदर्शन आचल राउतने केले. सर्व मान्यवरांचे स्वागत वृक्ष देवून करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME