आता महिलांनाही 6000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची मातृ वंदन योजना, लाभ घेण्यासाठी वाचा..
आता महिलांनाही 6000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची मातृ वंदन योजना, लाभ घेण्यासाठी वाचा..
भारतात केंद्र सरकारकडून दुर्बल घटक, महिला आणि इतर काही घटकांच्या विकासासाठी अनके वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. देशभरात शेतकऱ्यांना जसे वर्षाला अनुदान म्हणून प्रत्येकी 6000 रुपये मिळतात. तसेच आता महिलांसाठीही केंद्र सरकारची एक अशी योजना आहे, ज्याद्वारे देशभरातील अनेक महिलांना आथिर्क लाभ मिळू शकतो. ही मदत आर्थिक स्वरूपात असणार आहे. महिलांसाठीच्या या योजनेचं नाव पीएम मातृ वंदन योजना (PMMVY Scheme) असं आहे.
*पीएम मातृ वंदन योजनेचे फायदे काय?*
भारत हा कृषीप्रधान देश असून अनेक कारणांमुळे देशातील शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते, हे आपल्याला माहीतच आहे. तसे आता काही गरीब महिलांनाही आर्थिक मदत म्हणून केंद्र सरकार 6000 रुपये देणार आहे. याचा फायदा देशातील लाखो महिलांना होणार असून या योजनेचा हवा तेवढा प्रसार न झाल्यामुळे अनेक महिला आताही या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे केंद्र सरकार पीएम मातृ वंदन योजना ही योजना अनेक उपक्रमांतर्गत महिलांपर्यंत पोहोचवत असते. ही योजना केवळ महिलांसाठी राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून भारतातील महिलांना 6000 रुपये मिळतात. आता तुम्ही म्हणत असाल की, आम्ही या योजनेचा फायदा कसा घेऊ, तर माहितीनुसार गर्भवती असलेल्या तसेच स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत म्हणून 1 जानेवारी 2017 साली ही योजना सुरु झाली आहे. या योजनेस प्रधानमंत्री गर्भावस्था सहाय्यता योजना या नावानेही ओळखले जाते आणि या योजनेसाठी गर्भवती महिला अर्ज करु शकतात.
*कागदपत्रे काय लागतील?*
मुलाच्या जन्माचे प्रमाणपत्र
बँक खात्याचे पासबुक
आई-वडिलांचे आधार कार्ड
आई-वडिलांचे ओळखपत्र
पीएम मातृ वंदन योजनेचा (PMMVY Scheme) लाभ घेण्यासाठी तुम्ही केंद्र सरकारच्या पुढील वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घेऊ शकता https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana
Fakt garbhawati Manila Vyatirikt Itar marikana Sudha yojanecha labh milala Aase mala watate
ReplyDeleteExamples
Senior CITIZENS Mahila
Handicapped;
Niradhar e.t.c.