लोणार नगर परिषदेच्या वतीने ताले ठोको कार्यक्रमाची सुरुवात मोबाईल टॉवर सिल. टैक्स ना भरणाऱ्या कंपनीचे बेहाल.
लोणार नगर परिषदेच्या वतीने ताले ठोको कार्यक्रमाची सुरुवात
मोबाईल टॉवर सिल. टैक्स ना भरणाऱ्या कंपनीचे बेहाल.
युगनायक न्युज नेटवर्क
लोणार. प्रा लुकमान कुरेशी
लोणार शहरातील ४ विविध मोबाईल कंपन्यांचे टावर सिल करण्यात आले. काही कंपन्यांनी नियमांची पूर्तता न केल्याने व त्यांच्याकडे लाखो रुपयांची कराची थकबाकी असल्याने अश्या अनधिकृत मोबाईल टॉवर्सना सील करण्याची कारवाई लोणार नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्यधिकारी विठ्ठल केदारे यांनी केली. यामध्ये अनेक प्रमुख मोबाईल कंपन्यांच्या टाँवर्सना सील केले असून सदर कारवाईचे शहरात नगर परिषद चे महत्व सामान्य जनतेला समजले असून. जास्तीत जास्त कार भरणा होईल.
नगरपालिकेमध्ये नोंद असलेली टॉवर पैकी काही टॉवर अनाधिकृत आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता टावर उभारणी केली आहे व अनधिकृतरित्या वीज जोडणी घेतली आहे. अशा ४ टॉवर वर नगर परिषद मार्फत ही कारवाई करण्यात आली आहे. नगर परिषदने वारंवार सूचना देऊनही व कागदोपत्री व्यवहार करून ही कोणत्याही प्रकारची परवानगी त्यांनी घेतलेली नाही. या टॉवरवर तब्बल लाखो रुपयाची थकबाकी आहे. त्यामुळे नगर परिषदने थकबाकी असणाऱ्या मोबाईल कंपण्यावर काररवाई केली आहे.
सील करण्यात आलेल्या टाँवरमध्ये प्रामुख्याने एटीसी टेलिकॉम अंतर्गत आयडिया, वोडाफोन, टाटा, एअरटेल अशा विविध कंपनीच्या टाँवरचा समावेश आहे. या कारवाईमध्ये मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांच्यासमवेत पथक प्रमुख नगर रचना विभाग चे एस.एस.थोरात, कर निरीक्षक अन्वर शहा, आरोग्य विभागच अशोक निचंग, फुलचंद व्यास, संजीव ऐनेवार, प्रभू सानप, श्रीराम,सूर्यवंशी, विजय आढाव, किरण गरकळ,गजानन बाजड, नागरे, अशोक मादनकर, भालेराव, पोलीस विभागाचे भगवान नागरे, होम गा.सुरेश चव्हान, अनिकेत राठोड, सचिन आदी उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांनी शहरातील नागरिकांनी नगरपरिषदला कर भरून सहकार्य करावे होणाऱ्या अप्रिय कारवाई टाळावी असे आवाहन केले. आजच्या धडक कारवाईमुळे मोबाईल टाँवर कंपन्यांच्या उरात धडकी भरली असून एकच खळबळ उडाली आहे. मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांच्या धडक कारवाईचे सर्वत्र चर्चा होत आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME