भव्य मोफत नेत्र तपासणी व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर.
भव्य मोफत नेत्र तपासणी व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर
रिसोड :- (युगनायक न्युज नेटवर्क )
रिसोड शहर व परिसरातील , सर्व गरजू नेत्र रुग्णांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, आपल्या रिसोड शहरांमध्ये, *स्वर्गीय भगवानराव अर्जुनराव गायकवाड(महागाव) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ*, संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय नरसिंगराव बोडखे विद्यालय धोडप, तालुका रिसोड, व लायन्स क्लब रिसोड मीडटाऊन आणि लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर, यांच्या संयुक्त विद्यमाने, भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे, आयोजन दिनांक १० एप्रिल २०२२ रोज रविवार व तपासणी दिनांक ८ एप्रिल २०२२ रोज शुक्रवार ला करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर येथील नेत्ररोग तज्ञ डॉक्टर हे मोफत नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया उपचार करणार आहेत. तेव्हा या सुवर्ण संधीचा रिसोड शहर व परिसरातील गरजू रुग्णांनी, या मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा हि नम्र विनंती.
या शिबिरामध्ये नाव नोंदणीसाठी संपर्क :
संतोष क्लॉथ सेंटर, सिविल लाईन रिसोड.
श्रावणी मशिनरीज, पोस्ट ऑफिस समोर रिसोड
लायन्स डॉक्टर दिलीप धोपे साहेब, लोणी फाटा रिसोड.
लॉयन्स डॉक्टर नानासाहेब अवचार ,लोणी रोड, को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बाजूला.
लायोंस डॉक्टर तिवारी साहेब, लोणी रोड रिसोड
लॉयन्स डॉक्टर मधुकर देशमुख साहेब, लोणी रोड रिसोड
लॉयन्स डॉक्टर कुलदीप देशमुख साहेब ,भारत माध्यमिक कन्या शाळा कॉम्प्लेक्स रिसोड
आणि ,शेतकरी कृषी सेवा केंद्र वाघमारे कॉम्प्लेक्स ,लोणी फाटा रिसोड.
शिबिराची तपासणी दिनांक ८ एप्रिल २०२२ (रोज शुक्रवार) वेळ सकाळी ठीक ९ वाजल्यापासून.
शिबिराचे ठिकाण लॉयन्स डॉक्टर मधुकर देशमुख यांच्या साई डोळ्यांचा दवाखाना
पत्ता: डॉक्टर तिवारी यांच्या दवाखान्याच्या बाजूला ,लोणी रोड रिसोड.
तेव्हा रिसोड शहर व परिसरातील गरजू नेत्र रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा हि नम्र विनंती.....
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME