लोणार तालुक्यातील पळसखेड,हिरडव आणि जांभुळ येथील विटभटयांचा केला जाहीर लिलाव
लोणार तालुक्यातील पळसखेड,हिरडव आणि जांभुळ येथील विटभटयांचा केला जाहीर लिलाव
लोणार. प्रा लुकमान कुरेशी
लोणार तालुक्यातील पळसखेड , हिरडव , जांबुळ शिवारात असणा - या अनधिकृत विटभटयावर लोणारचे तहसिलदार सैपन नदाफ यांनी आपल्या पथकासमवेत दिनांक 17/3/2022 रोजी कार्यवाही करून सदर विटभटटी मालक व शेतमालक यांना दिनांक 23/3/2022 पर्यंत केलेला दंड भरण्याची मुदत देण्यात आलेली होती . परंतू सदर विट भटटी मालक व शेतमालक यांनी सदर दंड विहीत मुदतीत न भरल्याने आज दिनांक 24 मार्च रोजी रोजी पळसखेड , हिरडव , जांबुळ येथील विटभटयांचा जाहीर लिलाव करण्यात आला . सदर लिलावाची पुर्वसुचना जाहीरनामा पुर्वी काढुन पुर्वसुचना संबंधित गावामध्ये देण्यात आलेली होती , सदर लिलावाचे वेळी हिरडव , पळसखेड व जांबुळ येथील विटटयांची एकुण दिलेल्या दंडाची रक्कम ही 3,55,104 रुपये होती . तर प्रत्यक्ष लिलावात सर्वोचच बोली बोलुन 4,29,000 रूपयांना लिलाव कायम करण्यात येऊन चलान द्वारे सदर रक्कमेचा भरणा करण्यात आला . य लिलाव धारक यांना विटांचा ताबा देण्यात आला . सदर कार्यवाही सैपन नदाफ तहसिलदार लोणार यांनी केलेली असुन त्यांचे सोबत पथकात मंडळ अधिकारी हिरडव , सुलतानपूर , तलाठी हिरडव , सुलतानपूर पळसखेड , व्हि पी तुपकर महसूल सहाय्यक , भगवान मुसळे महसूल सहाय्यक व शिपाई पी बि मानवतकर यांनी केली आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME