पक्ष्यांसाठी चिमुकल्यांची धडपड! झाडांवर लावले जलपात्र :राष्ट्रीय हरित सेना एस एम सी इंग्लिश स्कूल, वाशीमचा उपक्रम
पक्ष्यांसाठी चिमुकल्यांची धडपड! झाडांवर लावले जलपात्र :राष्ट्रीय हरित सेना एस एम सी इंग्लिश स्कूल, वाशीमचा उपक्रम
वाशीम -(युगनायक न्यूज नेटवर्क ):स्थानिक एस एम सी इंग्लिश स्कूल मध्ये राष्ट्रीय हरित सेनेच्या चिमुकल्यांनी प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनात पक्षांना रणरणत्या उन्हापासून संरक्षण आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी जलपात्राची उभारणी करण्यात आली . सध्या पृथ्वी वरील वाढते तापमान, झपाट्याने होत असलेले आधुनिकीकरण -यांत्रीकीकरण आणि निसर्गीचा दुष्परिणाम यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे .सोबतच रासायनिक कीटकनाशकांच्या व खतांचा अति वापर यामुळे पक्षांची संख्या झपाट्याने कमी होत आहे त्यातच मोबाईल चे टाँवर, इंटरनेटचा अतिवापर आणि त्यातुन निघणार्या लहरींचा फटका पक्षांना बसत आहे. प्रत्येक्षात दिसणारा पक्षी (चिमणी) आता फक्त लहान मुलांना चित्रातच दिसण्याची वेळ आली आहे .पक्षी हा निसर्गाचा अतिशय महत्वाचा घटक असून तो पर्यावरणाचा समतोल सांभाळण्याचा एक महत्त्वाचा दुवा आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग ईकोक्लबच्या वतीने शाळेच्या व आजुबाजुच्या परिसरात जलपात्राची उभारणी केली असून पक्षांना दाणे व पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे .तसेच नागरिकांनी आपल्या घराच्या छतावर व आजुबाजुच्या परिसरात उन्हाळ्यात पाण्याचे छोटेसे भांडे ठेवावे व पक्षांना दाणे टाकावेत यामुळे पक्षांच्या कमी होणार्या संख्येला आळा बसेल तसेच त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी आपला हातभार लावावा असे आवाहन शाळेच्या प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक अभिजीत मुकुंदराव जोशी व हरित सेनेचे चिमुकले आराध्य चांडस्कर, गोविंद तिवारी, आझाद शेख, तन्मय खडसे, रितीका वाल्ली, श्रेया शिंदे ,अक्षय नवघरे, सौम्या मंत्री, सांची सरकटे, सिया अग्रवाल, सायली देशमुख, तनुश्री अवचार, अक्षरा अग्रवाल, यशमीत भाटी, फरहान शेख, गणेश बांगर, कृष्णा गुप्ता, भारत इंगोले, पियुष धुत, वेदांत घुगरे भुमिका घुले , प्रणव वाशीमकर, पार्थ ईढोळे, प्रांजल ईढोळे, प्रेमराज देशमुख, अथर्व काळे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME