अतिशय उत्साहाच्या वातावरणात शिवछत्रपतींचा भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण...
अतिशय उत्साहाच्या वातावरणात शिवछत्रपतींचा भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण...
अमडापुर प्रतिनिधि (युगनायक न्युज नेटवर्क )
गेली ३५० वर्षांपासून इथल्या प्रत्येक माणसाला ज्यांनी स्वाभिमानाची प्रेरणा दिली, असे हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा अमडापुर येथे शिवस्मारक समिति यांच्या माध्यमातुन अमडापुर येथे उभारण्यात आला आहे.दि 21 मार्च 2022 ला ढोल पथकाच्या गजरात,फटाक्याच्या आतिशबाजी,नारी शक्तिचा तलवारबाजी,लाठी काठी,आखाडा, dj च्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 15 फुट पुतळ्याचे अनावरण करण्यात आले लोकार्पण रामभाऊ बगाडे हिंदुराज प्रतिष्ठाण अध्यक्ष यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
अप्रतिम जल्लोष पहावयास मिळाला
अमडापुर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ज्याप्रमाणे अगदी थाटात छत्रपतींचे आगमन झाले त्याप्रमाणेच रुबाबात आणि जल्लोषात अमडापूर मध्ये एवढा भव्य दिव्य कार्यक्रम होणे ही खरंच अभिमानाची बाब आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त शिवस्मारक समिति व सर्व शिवभक्तांनि परिश्रम घेतले या कार्यक्रमात अमडापुरचे ठाणेदार नागेश कुमार चतरकर,व त्याचे सहकारी, शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजय दादा देशमुख,ज्ञानेश्वर सुरसे,पंकज देशमुख, प्रसाद देशमुख, कृष्णा देशमुख, व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेस पंचक्रोशीतिल सर्व शिवभक्त मोठया संख्येने उपस्थित होते ग्रामीण भागात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्र्वारुढ पुतळ्याचां अनावरण डॉ. जीवन देउळकर यांच्या अध्यक्षतेखाली व समिती च्या सर्व सदस्यांच्या व गावातील सर्व शिव भक्तांच्या मदतीने सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गणेश सपकाळ,मंगेश केळोदे,अक्षय आदबाने,सुरज गायकवाड़,सतिश पवनारकर,आकाश माळोदे,अक्षय टाक, संदीप पोपळघट,शिवा जाधव,पवन शिंदे,रवि लोखंडे,आकाश केलोदे,प्रभात देवकर,नारायण मानसकर,गौरव देशमुख, राम भुसारी ,तुषार ढोले,आकाश निकम,ऋतिक बिहाडे, साकेतराजे भोसले, संकेत मगर सागर कुसळकर,विकि खँडलकर, पवन खँडलकर यांनी परिश्रम घेतले
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME