स्वच्छतागृह, वॉटरफिल्टर डिजिटल क्लासरूम मागणीसाठी जि प सदस्य श्री. मोहन चौधरी यांना शाळा व्यवस्थापन समिती भट उमरा यांनी दिले निवेदन
स्वच्छतागृह, वॉटरफिल्टर डिजिटल क्लासरूम मागणीसाठी जि प सदस्य श्री. मोहन चौधरी यांना शाळा व्यवस्थापन समिती भट उमरा यांनी दिले निवेदन
वाशिम प्रतिनिधी (युगनायक न्युज नेटवर्क )
वाशिम तालुक्यातील भट उमरा :जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथ शाळा भट उमरा शाळेत विविध सुविधा प्राप्त व्हाव्या हा उदात्त हेतू ठेवून स्वच्छता गृह, डिजिटल क्लासरूम, वॉल कंपाउंड उंची वाढवणे, वॉटर फिल्टर या विविध कामासाठी जिल्हा परिषदेचे कार्यशील सदस्य मा.मोहनराव चौधरी यांना भटउमरा येथील शाळा व्यवस्थापन समिती च्या वतीने निवेदन देण्यात आले. शाळेला शासना मार्फत भौतिक सुविधा प्राप्त व्हाव्या व विध्यार्थ्याची मानसिकता चांगली रहावी शाळेत सर्व सोयी सुविधा असल्यास विध्यार्थ्यात शाळेविषयी आवड निर्माण होते.या हेतूने हे निवेदन दिले.यावेळी श्री.हरिभाऊ काळे, अध्यक्ष ,विनोद इंगळे उपाध्यक्ष, राजाराम काळे, विजय काळे सदस्य गणेश काळे,गणेश काळे, सदस्य शंकर राजगुरू, भरत काळे,गणेश इंगोले, रामहरी घनेर, गोलु काळे हजर होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME