भाजपचे हिंदुत्व खोटारडे हेच सत्य आहे. खासदार संजय जाधव
भाजपचे हिंदुत्व खोटारडे हेच सत्य आहे. खासदार संजय जाधव
लोणार. प्रा लुकमान कुरेशी -(युगनायक न्युज नेटवर्क )
भाजपचे हिंदुत्व केवळ भाषणापुरती मर्यादित असून हिंदू साठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्यास भाजप घरात बिळात लपते तर अशावेळी शिवसैनिकच रस्त्यावर उतरून हिंदुत्वाचे रक्षण करतात भाजपचे हिंदुत्व हे बेगडी आहे भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकू नय ते आमच्या रक्तात आहे असे रोखठोक मत परभणीचे खासदार संजय जाधव यांनी संपर्क अभियान दौऱ्यानिमित्त लोणारला आले असताना आपले मत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मेहकर विधानसभेचे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर शिवसेना जिल्हाप्रमुख प्राध्यापक बळीराम मापारी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाघ शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. आशाताई झोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष मापारी शिवसेना उपतालुका प्रमुख शिव पाटील तेजनकर बिरसा मुंडा संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान कोकाटे उपसभापती विठ्ठल नागरे भगवान पाटील सुलताने शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग सरकटे युवा सेना तालुका प्रमुख गजानन मापारी पंचायत समिती माजी उपसभापती हेमराज लाहोटी शिवसेना नगरसेवक डॉक्टर अनिल मापारी उपतालुका प्रमुख संतोष आघाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विठ्ठल घायाळ पंचायत समिती उपसभापती मदन सुट्टे गणेश सोसायटीचे अध्यक्ष गजेंद्र मापारी अशोक वारे पुरुषोत्तम केंद्रे प्रल्हाद सुलताने राम भालेराव किशोर मोरे अंकुश मुंडे सह बहु संख्येने शिवसैनिक यावेळी उपस्थित होते
यावेळी पुढे बोलताना खासदार संजय जाधव म्हणाले की मुंबईमध्ये 1993 मध्ये बॉम्बस्फोट झाले असता मुंबईला वाचवण्यासाठी हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसैनिक रस्त्यावर उतरले शिवसैनिक व बाळासाहेब रस्त्यावर उतरल्यामुळे मुंबई वाचली बाबरी मज्जिद शिवसैनिकांनी जमीनदोस्त केली मुस्लिम अतिरेक्यांनी अमरनाथ अमरनाथ यात्रा होऊ देणार नाही अशी धमकी दिली होती त्या वेळेस भाजपचा एकही नेता बाहेर आला नाही सगळे बिळात जाऊन बसले त्याच वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी हाज यात्रेसाठी मुंबईतून एकही विमान उद्या उडु देणार नाही अशी धमकी दिली या धमकीला घाबरुन मुस्लिम अतिरेक्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला व अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडली शिवसेनेचे हिंदुत्व हे खरे असून भाजपचे हिंदुत्व खोटारडे असा घणाघात खासदार जाधव यांनी केला यानंतर पुढे बोलताना खासदार जाधव म्हणाले की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा मतदारसंघातील प्रत्येक संस्थेवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे यासाठी गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक तयार करा असे आव्हान त्यांनी शिवसैनिकांना केले
कोरोना महामारी च्या काळात महाराष्ट्र संभाळण्याची जबाबदारी खर्याअर्थाने मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांनी पार पाडली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून त्यांच्यासाठी कर्जमाफी दिली कोरोना चे संकट असो दंगल असो शेतकऱ्याचे प्रश्न असो कायम शिवसेना रस्त्यावर उतरते त्यामुळे भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवु नहे ते प्रत्येक शिवसैनिकां च्या रक्तातच आहे असे प्रतिपादन जाधव यांनी केले
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME