मनोजभाऊ दांडगे आयोजित भव्य महाआरोग्य शिबिराला प्रचंड प्रतिसाद

 मनोजभाऊ दांडगे आयोजित भव्य महाआरोग्य शिबिराला प्रचंड प्रतिसाद



छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न,1500 रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ



गेल्या चार वर्षातील 5 वे आरोग्य शिबीर संपन्न झाल्याचा आनंद,राजकीय जुमलेबाजी म्हणून नाहीतर सातत्यपूर्ण रुग्णसेवा करणे हे कर्तव्य समजतो:-मनोज दांडगे


मासरूळ सर्कल मध्ये मनोजभाऊ दांडगे हेच जनतेचे खरे सेवक:-निलेश देठे


जामठी:-(युगनायक न्यूज नेटवर्क )(ता 27 फेब्रुवारी) बुलढाणा जिल्ह्याचे पालक मंत्री माननीय *नामदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष माननीय नाझेर काझी साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलढाणा जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक माननीय रवींद्रजी तौर साहेब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कामगार सेल माननीय *श्री मनोज भाऊ दांडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज* यांच्या जयंतीचे औचित्य साधत मासरूळ जिल्हा परिषद सर्कल मध्ये भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन ज्ञानदेवराव बापु दांडगे शैक्षणिक संकुल जामठी रोड धाड येथे काल दि.27 फेब्रुवारी 2022 वार रविवार रोजी सकाळी 10 ते सांयकाळी 6 वाजेच्या दरम्याम अतिशय उत्साहात पार पडले.भव्य महा आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवाजीभाऊ पालकर तर प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी नेते मा श्री डॉ पडघान साहेब तसेच मासरूळ जिल्हा परिषद सर्कल मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

         छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या भव्य महाआरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सदर शिबिरात सुमारे दीड हजार (1500) रुग्णांची तपासणी करण्यात आली या भव्य महाआरोग्य शिबिरामध्ये रुग्ण तपासणीचे विविध विभाग आखण्यात आले होते.एकूण 9 विभाग पाडले गेले त्यामध्ये विभागानुसार सर्व रुग्णांच्या नोंदी केल्या गेल्या त्यानुसार त्यांना त्या त्या विभागात मनोजभाऊ दांडगे यांच्या प्रतिनिधी मार्फत तपासणी कक्षात सोडण्यात आले.अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व प्रत्येक रुग्णाला व्यवस्थित तपासणी करून मोफत गोळ्या औषध देण्यात आल्या तसेच ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया सांगितली गेली अश्या रुग्णांना परत एक नोंदणी करून सर्व रुग्णांना एकत्र करून मा मनोजभाऊ दांडगे व गोदावरी फाऊंडशन जळगाव खान्देश येथे मोफत पाठविण्यात येऊन मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.या भव्य शिबिरात डॉ पडघान साहेब यांच्या माध्यमातून 15 डॉक्टर लोकांची टीम रुग्ण तपासणी करिता रुग्णसेवेत दाखल झाली होती त्यामध्ये  शस्त्रक्रिया विभाग मध्ये डॉक्टर संदीप साबळे एम एस (जनरल सर्जन), स्त्रीरोग विभागामध्ये डॉक्टर माधवी जवरे)स्त्रीरोग चिकित्सक व प्रसुती तज्ञ),दंतरोग विभाग मध्ये डॉक्टर गायत्री सावजी व डॉक्टर संदीप राजपूत,नेत्ररोग विभाग मध्ये डॉक्टर दिपाली पाटील(एमबीबीएस एमएस मुंबई),हृदयरोग विभागामध्ये डॉक्टर निखिल खरात(एमडी मेडिसिन), अस्थिरोग विभागामध्ये डॉक्टर ऋषिकेश निकम,बालरोग विभाग मध्ये डॉक्टर वैभव पांचाळ,मानसिक विभागांमध्ये डॉक्टर कुणाल शेवाळे, मूळव्याध विभागांमध्ये डॉक्टर सौ वैशाली पडघाण यांनी विभागानुसार रुग्णसेवा देऊन महाआरोग्य शिबिर उत्साहात पार पडण्यास परिश्रम घेतले.

        या भव्य महाआरोग्य शिबिराच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष निलेश भाऊ देठे यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकात मा मनोजभाऊ दांडगे यांच्या सामाजिक व राजकीय कार्यावर प्रकाश टाकत मनोजभाऊ दांडगे हेच जनतेचे खरे सेवक आहेत असे मनोगत व्यक्त केले व शेवटी त्यांनी मासरूळ जिल्हा परिषद सर्कल मध्ये येणाऱ्या निवडणुका तोंडावर असल्याने काही पुढारी राजकीय जुमलेबाजी करून लोकांची मने जिंकण्याचा व मतदान रुपी आशीर्वाद मिळण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आज परंतु मासरूळ जिल्हा परिषद सर्कल मधील जनता आता हुशार झाली आहे व येणाऱ्या काळात मासरूळ सर्कल मध्ये मनोजभाऊ दांडगे यांच्या रूपाने एक कार्य कर्तृत्ववान नेता मिळणार आहे यात तिळमात्र शंका नसावी व विरोधकांनी सुद्धा कामाची स्पर्धा कामाशी करावी,विचारांची लढाई विचाराने व्हावी असेही ते म्हणाले.तसेच ज्यांच्या संकल्पनेतून हे महाआरोग्य शिबिर संपन्न झाले असे मा मनोजभाऊ दांडगे यांनी आपल्या भाषणात सांगितले की मी गेल्या चार वर्षांपासून सातत्यपूर्ण विविध आरोग्य शिबिरे घेतली,रक्तदान शिबिर घेतली, डोळ्यांच्या ऑपरेशन साठी जळगाव खांदेश येथे रुग्णांना पाठवले व आतापर्यंत डोळ्यांचे 500 च्या वर व इतर आजारावरच्या जवळपास 950 ते 1000 पर्यंत शस्त्रक्रिया यशस्वी करून आणल्या.केवळ राजकीय हेतूने नाहीतर एक सामाजिक बांधिलकी म्हणून रुग्ण सेवा करत आलो आहे व भविष्यात करत राहील यात शंका नसावी.शेवटी त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की या भव्य महाआरोग्य शिबिरात (1500)दीड हजाराच्या वर रुग्णांनी नोंदणी करून विविध आजारावर तपासण्या,रोगनिदान व औषध उपचार घेतले याचा मनस्वी आनंद आहे ,रुग्ण सेवा केल्याचे समाधान वाटत आहे.तसेच राष्ट्रवादी जेष्ठ नेते विठ्ठलसिंग मोरे यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त करत मनोजभाऊ दांडगे यांच्या कोरोना काळातील कामगिरीवर प्रकाश टाकला सर्वांचे लक्ष वेधले.

         मासरूळ जिल्हा परिषद अंतर्गत पार पडलेल्या या भव्य महाआरोग्य शिबिरा प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस नसीम सेठ,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा सरपंच कुलमखेड माननीय श्री विठ्ठल सिंग मोरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश भाऊ देठे,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजू पाटील नागवे,राष्ट्रवादी जेष्ठ नेते डॉ ज्ञानेश्वरजी गावंडे साहेब,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजू भाऊ नरोटे,सुगदेवराव नरोटे,राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस विजू पाटील धंदर,राष्ट्रवादी कॉंग्रेस चिखली विधानसभा उपाध्यक्ष गणेश नरवाडे पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका कार्याध्यक्षा निर्मलाताई गणेश तायडे,पाडळी चे सरपंच जयेश भाऊ पवार,राष्ट्रवादी जेष्ठ नेते हरिभाऊ सीनकर,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शेषराव पाटील कानडजे,राष्ट्रवादी नेते साहेबराव पाटील पडोळ,राष्ट्रवादीचे युवा नेते तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस बुलढाणा तालुका उपाध्यक्ष गजानन भाऊ पालकर,जनुना चे सरपंच बंडू भाऊ मुत्रे,धामणगाव येथील सर्जेराव भाऊ ठाकूर,सातगावचे राष्ट्रवादीचे नेते तथा उपसरपंच प्रदीप भाऊ घुसवळकर,राष्ट्रवादी तालुका काँग्रेस सरचिटणीस सुशील भाऊ हिवाळे,सुनील भाऊ हिवाळे,गणेश पाटील धंदर,राष्ट्रवादी युवा नेते नंदू भाऊ रत्नपारखी,कुंबेफळ येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दत्तू भाऊ आघाव,राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका सरचिटणीस महेंद्र भाऊ कड,राष्ट्रवादी युवा नेते अजय भाऊ गायकवाड,राष्ट्रवादी काँग्रेस बुलढाणा तालुका सरचिटणीस कबीर भाऊ बर्डे,जनुना राष्ट्रवादी शाखा अध्यक्ष गजानन भाऊ नरोटे,जनुना राष्ट्रवादी युवा शाखा अध्यक्ष महेश भाऊ हिवाळे,राजू गुळवे पाटील,विष्णू गुळवे पाटील,देविदास भाऊ महाले,रमेश भाऊ महाले,राष्ट्रवादी कुंबेफळ शाखा अध्यक्ष अंबादास बावस्कार, राष्ट्रवादी युवा नेता दत्ता भाऊ गोराडे, राष्ट्रवादी युवक कांग्रेस तालुका सरचिटणीस राजू पाटील धंदर,भीमराव भाऊ पायघन,राष्ट्रवादीचे नेते गणेश पाटील धंदर, धामणगाव चे राष्ट्रवादी शाखेचे अध्यक्ष शंकर भाऊ अपार,मासरुळ राष्ट्रवादी युवक काँग्रेस शाखा अध्यक्ष किरण भाऊ काटोले,मासरूळ प्रौढ शाखा उपाध्यक्ष समाधान भाऊ पुसे,युवक शाखा अध्यक्ष विजय भाऊ गायकवाड, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भगवान भाऊ सिनकर,राष्ट्रवादी युवा नेते राहुल भाऊ महाले,राष्ट्रवादी युवा नेते किरण भाऊ देशमुख,दीपक भाऊ देशमुख,राष्ट्रवादी युवक नेते प्रदीप भाऊ नरोटे,राष्ट्रवादी युवा नेते जगन भाऊ मिरगे,कमलाकर पोतदार,भगवान पवार,राष्ट्रवादी जेष्ठ नेते।सुगदेव भाऊ नरोटे,राष्ट्रवादी जेष्ठ नेते प्रभू भैया जैस्वाल,गुम्मी माजी सरपंच वसंता पाटील नरोटे,जामठी सरपंच बिलाल भाऊ गायकवाड,जामठी माजी सरपंच तथा राष्ट्रवादी जेष्ठ नेते भगवान तायडे पाटील,राष्ट्रवादी जेष्ठ नेते जक्का सेठ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिखली विधानसभा सरचिटणीस रामेश्वर पाटील तायडे,राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुका कार्याध्यक्ष गणेश तायडे पाटील,राष्ट्रवादी युवा नेते तथा उपसरपंच वरुड दिलीप भाऊ पांडव,राष्ट्रवादी जेष्ठ नेते संतोष पाटील राऊत,पिंपळे काका,कारभारी पिंपळे,भगवान भाऊ पिंपळे,रंगराव भाऊ पिंपळे,राष्ट्रवादी पंगरखेड शाखा अध्यक्ष शरद भाऊ पिंपळे,राष्ट्रवादी कामगार सेल जिल्हा उपाध्यक्ष शरद ताठे पाटील,गणेश भाऊ पिंपळे,राष्ट्रवादी नेते रामू भाऊ कचाटे,राष्ट्रवादी युवक शाखा अध्यक्ष राहुल भाऊ सोनुने,कडूबा वराडे,राजू भाऊ गायकवाड,राष्ट्रवादी युवा नेते संतोष भाऊ दांडगे,राष्ट्रवादी युवा नेते उमेश भाऊ दांडगे यांची उपस्थिती लाभली होती.

        या भव्य महाआरोग्य शिबिराचे सूत्रसंचालन दांडगे शैक्षणिक संकुल धाड चे प्राचार्य डवले सर यांनी केले,प्रास्ताविक निलेश भाऊ देठे तर आभार प्रदर्शन दांडगे स्कुल एच ओ डी चव्हाण सर यांनी केले. यावेळी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर कलम 144 सर्व नियम पाळून सोशल डिस्टन ठेवून यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्ञानदेवराव बापु दांडगे शैक्षणिक संकुल धाड चे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू