प्रथम अतिक्रमण नियमाकुल करा -तेव्हाच घरकुल योजनेचा लाभ द्या -बेघर गोरगरीबाची मागणी
प्रथम अतिक्रमण नियमाकुल करा -तेव्हाच घरकुल योजनेचा लाभ द्या -बेघर गोरगरीबाची मागणी
रिसोड:--दिनांक २0(भारत कांबळे प्रतिनिधी ) रिसोड तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण खेडेगावातील रमाई घरकुल योजनेत. पात्र व गरजु लोकांची नावे प्रपत्र ड यादीमध्ये समाविष्ट असली तरी. अनेक बेघर कुंटुबाची अतीक्रमने असल्याने. हे लाभार्थी घरकुला पासुन वंचित राहतात की काय? असा प्रश्न बेघर गोरगरीब भुमीहिन शेतमजुर महिलांना सतावत आहे. तरी शासनाने प्रथम लाभार्थ्यांच्या नावे अतीक्रमने नियमाकुल करावीत. व त्यांनाच घरकुल योजनेचा लाभ घ्यावा. अशी मागणी बेघर गोरगरीब भुमीहिन शेतमजुर कुंटुबिया कडुन होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रिसोड तालुक्यातील रिठद जिल्हा परिषद गटातील बेलखेडा. पार्डीतिखे. हिवरापेन.वरुडतोफा.कोयाळी.आसेगावपेन. खडकी ढिगारे. येवती. रिठद अशा अनेक गावात दलीत वस्ती. झोपडपट्टी. अल्पभूधारक शेतकरी. गोरगरीब. भुमीहिन. शेतमजुर कच्च्या घरामध्ये वास्तव्य करून. आपले जीवन जगत आहेत. यांची नावे रमाई घरकुल योजना. व पंतप्रधान आवास योजना यादीमध्ये यांची नावे आहेत. मात्र नमुना ८ मध्ये जागेचा मालक सरकार अशी नोंद असल्याने. सदर पात्र लाभार्थ्यांना घरकुल व मुलभुत सुवीधा पासुन कोसोदुर राहावे लागते. असे असले तरी शासनाच्या नविन जिआर नुसार सन- २०११ पुर्वीचे अतीक्रमने नियमाकुल करावीत असे नमुना आहे. पंरतु या बाबत संबधित शासकीय अधिकारी व प्रशासन जाणीव पुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येताआहे. असली ही बाब अंत्यत अन्याय कारक असून. संपूर्ण तालुक्यातील गावागावातील गावठाना व ई-क्लास जमीनीवरील अतीक्रमने नियमाकुल करावीत. व गोरगरीब भुमीहिन शेतमजुर बेघर लाभार्थ्यांना घरकुल देऊन. दिलासा ध्यावा. अशी मागणी सर्वत्र होत आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME