Posts

शरद देशमुख यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार

Image
  शरद देशमुख यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार जउळका रेल्वे प्रतिनिधी महाराष्ट्र शिक्षक पॅनल ( Msp) तर्फे श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिम येथील तंत्रस्नेही उपक्रमशील शिक्षक श्री शरद दत्तराव देशमुख यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला        श्री शरद देशमुख यांनी ज्ञानयात्री तंत्रस्नेही शैक्षणिक स्थळाची निर्मिती करून त्याद्वारे विविध व नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी सातत्याने दररोज न चुकता राबवले यामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम दररोज विविध प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून वर्षभर राबवत आहे. तसेच गाथा बलिदानाची, शिकु आनंदे, गोष्टीचा शनिवार, विज्ञानाचा गुरुवार दिनविशेष चाचणी व्हाट्सअप स्वाध्याय ई लायब्ररी थँक्स फॉर टीचर या व अशा अनेक उपक्रमाद्वारे शैक्षणिक स्थळ अद्यावत ठेवून याद्वारे लाखो शिक्षक विद्यार्थी व  पालकांपर्यंत घराघरात पोहोचले.                   त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगी...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करा .‌ - मदन तिरके

Image
  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करा .‌ - मदन तिरके                                 मा.मदन तिरके                                           (धनगर समाज युवा मल्हार सेना रिसोड तालुका अध्यक्ष)       रिसोड . (युगनायक न्यूज नेटवर्क ) जगात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या कोवीड 19 च्या प्रादुर्भावामुळे आपण जयंती साजरी करू शकलो नाही.  परंतु या वर्षी आपल्याला जयंती मोठया उत्साहात साजरी करायची आहे, म्हणून सर्व समाज बांधवांना आवाहन करतो की जयंती धुमधडाक्यात साजरी करा .........

SBI RSETI च्या वतीने घेण्यात आलेल्या दुचाकी दुरुस्ती व मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षणाचा समारोप

Image
SBI RSETI च्या वतीने घेण्यात आलेल्या दुचाकी दुरुस्ती व मोबाईल दुरुस्ती  प्रशिक्षणाचा समारोप   वाशीम  (युगनायक न्यूज नेटवर्क ) SBI RSETI च्या वतीने घेण्यात आलेल्या दुचाकी दुरुस्ती व मोबाईल दुरुस्ती  प्रशिक्षणाचा समारोप नुकताच पार पडला SBI RSETI वाशीमच्या वतीने विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जातात अशाच प्रकारे दुचाकी दुरुस्ती व मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षनाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये एकूण 43 प्रशिक्षनाथ्री नी सहभाग घेतला होता सदर प्रशिक्षनार्थी ना मोफत राहण्याची व जेवणाची सोय उपलब्ध होती दुचाकी दुरुस्ती प्रशिक्षनासाठी मार्गदर्शक म्हणून श्री मिस्त्री तर मोबाइल प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून श्री चव्हाण यांनी काम पाहिले RSETI चे संचालक श्री सूर्यकांत फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रशिक्षण आयोजित केली जातात

वाशीम येथे प्रा. डॉ. शरण खानापुरे यांची विभागीय कार्यशाळा.

Image
  वाशीम येथे प्रा. डॉ. शरण खानापुरे यांची विभागीय कार्यशाळा.  वाशीम :  (विशेष प्रतिनिधी   -विलास बेदरे ) वाशीम येथे दि.5 जून 2022 ला अग्रसेन भवन, अग्रसेन चोक, जुनी नगर परिषद, वाशीम येथे महाराष्ट्र राज्यातील कोळी महादेव, टोकरे कोळी, मल्हार कोळी, डोंगरे कोळी, ढोर कोळी, यांना 70 वर्षा पासून संविधानिक अधिकारा पासून जाणीवपूर्वक वंचीत ठेवणाऱ्या सर्व पडताळणी समित्या, प्रांत अधिकारीआदिवासी मंत्री, आमदार, खासदार. केंद्र सरकार कडून महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्रतील लोकसंख्येच्या आधारे आदिवासी लोकसंख्या ही 9% आहे त्या पैकी tsp मध्ये 4% च्या लोकसंख्येवर 11 आमदार आणी 2  खासदार यांचे राखीव मतदार संघ असतात/निवडून येतात,आणी उर्वरित otsp मधील 5% लोकसंखेच्या आधारे 15 आमदार आणी 2खासदार यांच्यासाठी मतदार संघ राखीव असतात,otsp मधील आदिवासी यांची  लोकसंख्या दाखवून, ज्यांच्या नावाने हजारो करोड रुपये निधी उचल्ल्या जातो,आणी 15आमदार 2 खासदार, निवडून येतात,त्या कोळी जमातीला साधे जात प्रमाणपत्र, व वेधता प्रमाणपत्र सुद्धा दिले जात नाही. ई. स.1871 पासून आज अखेर पर्यंत otsp मधील बेरार प्...

रिठद येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून १०० सेकंदाची मानवंदना देण्यात आली

Image
रिठद येथे  छत्रपती शाहू महाराज यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून  १०० सेकंदाची मानवंदना  देण्यात आली रिसोड . ( जितेश गायकवाड ) रिठद येथे छत्रपती शाहू महाराज आरक्षणाचे जनक यांच्या पावन स्मृतस कोटी कोटी प्रणाम. रिठद नगरमध्ये ता. रिसोड. येथे सकाळी 10 वाजता 100 सेकंदाची मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शाहू महाराज यांच्या कार्याची ओळख करून दिली या प्रसंगी निलेश अंभोरे व संजय विश्वनाथ अंभोरे यांनी शाहू महाराज यांच्या जिवन प्रसंगावर प्रकाश टाकला. या वेळी पं. स. सदस्य श्री गजानन आरू, माजी. जि. प. सदस्या श्रीमती पंचकुला बाई अंभोरे, माजी. रिठद चे सरपंच प्रल्हाद अंभोरे, डिगांबर अंभोरे रमेश अंभोरे, सिद्धार्थ अंभोरे, मधुकर अंभोरे प्रल्हाद ताजने, कैलास ताजने जितेश गायकवाड, संतोष खिल्लारे यादव आरु, सुमेध ताजने अरविंद कांबळे आणि बरेच जण मान्य वर उपस्थित होते.

शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एकबुर्जी धरणाची उंची वाढवा

Image
  शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एकबुर्जी धरणाची उंची वाढवा वंचित बहूजन आघाडीची मुख्यमंत्र्यांना मागणी प्रदेश सदस्या सौ. किरणताई गिर्‍हे यांचा पुढाकार वाशिम - (युगनायक न्यूज नेटवर्क ) शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे एकबुर्जी धरणातुन वाशिमकरांना पुरेसे पिण्याचे पाणी मिळत्र नाही. त्यात उन्हाळ्याच्या दिवसात ही पाणीटंचाई तीव्र स्वरुपात निर्माण होत असल्यामुळे नागरीकांना नाईलाजाने विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. या पाणीटंचाईच्या समस्येवर मात करुन नागरीकांना दिलासा देण्यासाठी एकबुर्जी धरणाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी वंचित बहूजन आघाडीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. ५ मे रोजी वंचितच्या प्रदेश सदस्या सौ. किरणताई गिर्‍हे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष डॉ. गजानन हुले, जिल्हा महासचिव सोनाजी इंगळे, जिल्हासचिव उत्तम झगडे, तालुकाअध्यक्ष नारायण खोडके, बालाजी राऊत, अनिल कांबळे, जिल्हा सचिव वसंतराव हिवराळे, तालुका महासचिव संजय पडघान, तालुका उपाध्यक्ष प्रविण मोरे, किशोर खडसे, शालीग्राम खडसे, उमेश राऊ...

कामगार एकत्र येऊन जो पर्यंत संघटित होत नाहीत व हक्कासाठी पूर्ण ताकतीने लढा देत नाहीत तो पर्यंत त्यांच्यावर अन्याय होत राहतील -ॲड. भारत गवळी

Image
  कामगार एकत्र येऊन जो पर्यंत संघटित होत नाहीत व हक्कासाठी पूर्ण ताकतीने लढा देत नाहीत तो पर्यंत त्यांच्यावर  अन्याय होत राहतील -ॲड. भारत गवळी  वाशीम   -(प्रतिनिधी जितेश  गायकवाड ) कामगार कल्याण केंद्र वाशीम येथे आज दिनांक 1मे 2022 रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिना  निमित्त, बांधकाम कामगार व कामगार कुटुंबीय करिता   " कामगाराची दशा व दिशा कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर " आयोजित करण्यात आले होते. या वेळी  कार्यक्रमाचे अध्यक्ष, माननीय श्री सुनील भाऊ कल्ले, आपत्ती व्यवस्थापक . अकोला , कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री गजानन मेसरे, कार्यक्रमाचे वक्ते माननीय ॲड, भारत गवळी, प्रमुख मार्गदर्शक मा.ॲड गजेंद्र सरपाते ,जिल्हा  व सत्र न्यायालय, वाशिम, तसेच मा. श्री तेजराव वानखेडे वसुली अधिकारी वाशिम अर्बन बँक वाशिम , संजय राजगुरू , सोनाली गर्जे होते. या कायदे विषयक शिबिरात बोलताना  ऍड. भारत गवळी यांनी कामगार विषयी  सांगितले की,  कामगार एकत्र येऊन जो पर्यंत संघटित होत नाहीत व आपल्या हक्कासाठी ताकतीने लढा देत नाहीत, तो प...

वाशिम येथे वंचित बहुजन आघाडी चा शांतता मार्च संपन्न

Image
  वाशिम येथे वंचित बहुजन आघाडी चा शांतता  मार्च संपन्न              वाशीम - (युगनायक न्युज नेटवर्क ) आज nदिनांक 01 मार्च 2022 रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा श्रध्येय ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी वाशीमच्या वतीने वाशिम येथील छ शिवाजी महाराज चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान जिल्हाध्यक्ष डॉ गजानन हुले यांच्या अध्यक्षतेखाली शांतता मार्च काढण्यात आला. छ शिवाजी महाराज चौकापासून पाटणी चौक मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शांततेत आली. शांतता मार्च मध्ये कुठल्याही प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या नाहीत. प्रत्येकाच्या हातात शांतता प्रस्थापित करण्यासाठी फलक घेऊन वाशिम शहरात एक नवीन आदर्श घालवून दिला. शांतता मार्च ची सांगता डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान वाशिम येथे पार पडली. शांतता मार्च समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ गजानन हुले हे होते, प्रमुख उपस्थिती म्हणून प्रदेश सदस्या किरणताई गिर्हे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ सिद्धार्थ देवळे, जिल्हामहासचिव सोनाजी इंगळे, मार्गदर्शक दत्तराव गोटे, जिल्हाउपाध्यक्ष प...

कामगार एकत्र येऊन जो पर्यंत संघटित होत नाहीत तो पर्यंत त्यांच्यावर अन्याय होतच राहतील -ॲड. भारत गवळी

Image
कामगार एकत्र येऊन जो पर्यंत संघटित होत नाहीत तो पर्यंत त्यांच्यावर  अन्याय होतच राहतील - ॲड. भारत गवळी    वाशीम   (जितेश गायकवाड ) -(प्रतिनिधी ) कामगार कल्याण केंद्र वाशीम येथे आज दिनांक 1मे2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिन निमित्त बांधकाम कामगार व कामगार कुटुंबीय करिता कामगाराची दशा व दिशा कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित केले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुनील भाऊ कल्ले, आपत्ती व्यवस्थापक अकोला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री गजानन मेसरे, कार्यक्रमाचे वक्ते माननीय ॲड, भारत गवळी, मा.ॲड गजेंद्र सरपाते, माननीय श्री तेजराव वानखेडे वसुली अधिकारी वाशिम अर्बन बँक वाशिम हे होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता, बी. बी. पांगसे, गजानन आरु, मालती दाभाडे, मंगला नवरे, अंबिका कठाडे, प्रमिला ढोके योगेश गोटे बांधकाम निरीक्षकविभाग वाशीम आदी उपस्थित होते. त्यावेळी ऍड. भारत गवळी मार्गदर्शन करतांना बोलत कामगार एकत्र येऊन जो पर्यंत संघटित होत नाहीत तो पर्यंत त्यांच्यावर  अन्याय होतच राहतील कारण या भांडवलशाहीत  काम...

कामगार कल्याण केंद्र वाशीम मार्फत कायदे विषयक शिबीर संपन्न

Image
कामगार कल्याण केंद्र वाशीम  मार्फत कायदे विषयक शिबीर संपन्न  वाशीम   (जितेश गायकवाड ) -(प्रतिनिधी ) कामगार कल्याण केंद्र वाशीम येथे आज दिनांक 1मे2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिन निमित्त बांधकाम कामगार व कामगार कुटुंबीय करिता कामगाराची दशा व दिशा कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित केले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुनील भाऊ कल्ले, आपत्ती व्यवस्थापक अकोला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री गजानन मेसरे, कार्यक्रमाचे वक्ते माननीय ॲड, भारत गवळी, मा.ॲड गजेंद्र सरपाते, माननीय श्री तेजराव वानखेडे वसुली अधिकारी वाशिम अर्बन बँक वाशिम हे होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता, बी. बी. पांगसे, गजानन आरु, मालती दाभाडे, मंगला नवरे, अंबिका कठाडे, प्रमिला ढोके योगेश गोटे बांधकाम निरीक्षकविभाग वाशीम आदी उपस्थित होते होते

पुरातन वास्तू लिंबी बारव पासून जाणाऱ्या जुनी पांग्रा पांदण रस्त्यावरील अतिक्रमण धारकांवर कार्यवाही करावी-प्रकाश नागरे भाजपा ता.सरचिटणीस

Image
पुरातन वास्तू लिंबी बारव पासून जाणाऱ्या जुनी पांग्रा पांदण रस्त्यावरील अतिक्रमण धारकांवर कार्यवाही करावी-प्रकाश नागरे भाजपा ता.सरचिटणी लोणार (युगनायक न्युज नेटवर्क )     लोणार शहर विकास आराखड्यातील पुरातन विभागाची वास्तू लिंबी बारव पासून जाणारा 33 फूट रुंद जुनी पांग्रा पांदण रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता पर्यटकांसाठी खुला करावा अशी तक्रार दिनांक 21/4/2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे केली आहे. तक्रारीत असे नमूद केले आहे की लोणार नगर पलिका हद्दीतील सर्वे नं,218/1-219 मधून जाणारी जुनी पांग्रा पांदण ही पांग्रा,टिटवी,धाड,रायगाव,पुढे मराठवाड्यातील अनेक गावांना जोडणारा रस्ता होता,आजही लोणार नगर पलिका हद्दीत पांदण वापरात आहे,तसेच मंठा बायपास वरून लिंबी बारव कडे रस्ता कायम आहे,परंतु सर्वे नं. 219 मध्ये मंठा बायपास जवळ सदर रस्त्यात सौ.वनमाला मुक्ताजी सोनुने यांनी अनाधिकृत बांधकाम केले आहे त्यामुळे सदर पांदण रस्ता हा अरुंद झाला आहे,तसेच लिंबी बारव पासून 100 मीटर अंतरावर दुसरे अनाधिकृत बांधकाम मुक्ताजी लक्ष्मण सोनुने यांनी गोडाऊन चे बांधकाम करून सम्पूर्ण पांदण रस्ता हा स्व...

शेतकऱ्याच्या समर्थनार्थ भाजपा मैदानात.

Image
  शेतकऱ्याच्या समर्थनार्थ भाजपा मैदानात. लोणार . तालुका प्रतिनिधी      लोणार तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती 22/03/2022  ती 19/4/ 2022 पर्यंत आहे जवळपास एक महिना बंद आहे या सर्व गलथान कारभाराला बाजार  समितीचे संचालक मंडळ जबाबदार आहे असा आरोप भाजपा शहराध्यक्ष गजानन मापारी यांनी केला आहे,एका महिन्यापासून बंद असलेले बाजार समिती 19/4/2022 ला सुरू करण्यात आली परंतु काही तासानंतर लगेच खरेदीदाराने खरेदी बंद केली या धोरणामुळे हजारो शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे खरीप हंगामाच्या अगोदर शेती मशागतीसाठी पैशाची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांना आपला शेतमाल मार्केटमध्ये विकण्याशिवाय पर्याय राहत नाही परंतु अशा वेळेसच कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचा असा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे ? सर्व कारभाराला कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व संचालक मंडळ जबाबदार आहेत,मागील 20 वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेची एकहाती सत्ता असताना सुद्धा संचालक मंडळाच्या  हाकेखोर  पणामुळे बिबी,सुलतानपूर येथील उपबाजार समिती बंद पडल्या ...

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना महावितरण लोणार कडुन नाष्टा ना मिळाल्याचे राग लोणार जनतेला लोडशेडिंग च्या रूपात मिळत आहे

Image
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना महावितरण लोणार कडुन नाष्टा ना मिळाल्याचे राग लोणार जनतेला लोडशेडिंग च्या रूपात मिळत आहे काँग्रेस नगरसेवक आबेद खान यांचा घरचा आहेर  लोणार . प्रा लुकमान कुरैशी                                                दिनांक २३/४/२०२२ महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राउत हे लोणार येथे १ मार्च रोजी विविध विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्याला आले होते त्या वेळी त्यांनी ग्राहक मेळावा आयोजित केला होता परंतु त्या ग्राहक मेळाव्याचे प्रचार आणि प्रसार न केल्याने त्या ठिकाणी ग्राहकच बोटावर मोजण्या इतके उपस्थित होते त्या नंतर ते त्या ठिकाणावरून लोणार येथील वनकुटी येथे अल्पोहर करण्यासाठी गेले मात्र लोणार विद्युत विभागाने त्यांची तिथे कोणतीच व्यवस्था न केल्याने त्यांनी तेव्हा पासून लोणार विषयी राग मनात ठेउन आता कारण नसतांना अतिरिक्त लोडशेडिंग सुरू केले असल्याचा आरोप काँग्रेस  नगररिषद चे नगरसेवक आबेद खान मोमीन खान पठाण यांनी केला आहे सद्या सर्व समाज बा...

वाशिम जिल्ह्यातील अवेळी लादण्यात आलेली लोडशेडिंग बंद करण्याची मागणी.

Image
  वाशिम जिल्ह्यातील अवेळी लादण्यात आलेली लोडशेडिंग बंद करण्याची  मागणी. वाशिम दि.२१ (युगनायक  न्यूज नेटवर्क ) सद्यस्थितीत वाशिम जिल्ह्यात तापमानामध्ये ४२ अंश सेल्सिअस प्रचंड वाढ झालेली आहे . परिणामी नागरिकांना उकाडा असह्य होत आहे . त्यामुळे सामान्य नागरिकांवर अवेळी लादण्यात आलेल्या लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत अशातच जिल्ह्यात तापमानामध्ये वाढ झाली असून उष्माघात या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत तसेच अवेळी लोडशेडिंगमुळे हिवताप , डेंग्यू , मलेरिया या आजाराने लोक भयभीत झाले असून दवाखान्यात प्रचंड गर्दी होत आहे . यामुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे . तरी मा.महोदय यांनी वरील अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून जिल्ह्यातील अवेळी लादण्यात आलेली लोडशेडिंग बंद करण्यात यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळेल व त्यांचे स्वास्थ टिकून राहील . असे निवेदन भगवान ढोले यांनी- मा . ना . उद्धवजी ठाकरे , मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य मुंबई, मा . ना . अजित पवार , उपमुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य मुंबई, मा . ना . डॉ . नितीन राऊत , उर्जामंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, म...

कमळजा देवी संस्थान मंदिराची जमीन प्रकरणात तहसीलदारांची कार्यालयीन चौकशी करावी- प्रकाश नागरे

Image
  कमळजा देवी संस्थान मंदिराची जमीन प्रकरणात तहसीलदारांची कार्यालयीन चौकशी करावी- प्रकाश नागरे लोणार . (युगनायक न्युज नेटवर्क ) उल्कानगरी लोणार आराध्य दैवत देवी कमळजा माता मंदिर देवस्थान दिवाबत्तीची सोय म्हणून लोणार सर्वे,नं 109 मधील जमीन ही इनाम म्हणून खलील व्यक्तींना देखभालीसाठी देण्यात आली होती त्या व्यक्तींची नावे सुभाष बंन्सीलाल बोरा,सचिन कुमार सुभाषचंद्र बोरा,प्रदीप कुमार रमणलाल बोरा,रमणलाल कचरूलाल बोरा या व्यक्तींना देण्यात आली होती परंतु कालांतराने तत्कालीन तहसीलदार,तलाठी,मंडळ अधिकारी यांच्या संगणमत करून सरकारी दस्तावेज यामध्ये खाडखोड करून परस्पर नावावर करून,व विक्री केली तरी सदर प्रकरण तसिलदार साहेब तहसील कार्यालय लोणार यांच्या कोर्टामध्ये दि,08/02/2018 मध्ये दाखल केले असून सदर प्रकरण शेवटची नोटीस 21/12/2021रोजी काढण्यात आली होती त्या नोटिशी नुसार सुनावणी 11/12/2022 रोजी 11.00वाजता ठेवण्यात आली होती तेव्हा पासून सदर प्रकरण तहसिलदाराकडून निकाली काढण्यात आले  आणि परंतु आजपर्यंत सदर प्रकरण निकाल देण्यात आलेला नाही.यासंदर्भात वेळोवेळी विचारणा केली असता तहसीलदार यांच्याकडून...

आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी ८७ कोटी रुपयांचा धनादेश पुणे महानगरपालिकेकडे सूपूर्द

Image
  आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी ८७ कोटी रुपयांचा धनादेश पुणे महानगरपालिकेकडे सूपूर्द पुणे ,-(पब्लिक न्यूज नेटवर्क ) दि. २२:  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संगमवाडी येथील आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या नियोजित स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाकडील ८७ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. स्मारकाबाबत शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीस विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, समाज कल्याण उपायुक्त रवींद्र कदम पाटील, सहायक आयुक्त समाज कल्याण संगीता डावखर, स्मारक समितीचे अध्यक्ष विजय बापू डाकले, समितीचे सदस्य बाळासाहेब भांडे, रवी पाटोळे, रामभाऊ कसबे, डॉ. राजू अडागळे, शांतीलाल मिसाळ आदी उपस्थित होते. यावेळी आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकाबाबत जागेचे भूसंपादन, स्मारकाचा नियोजित आराखडा, बांधकाम, त्याकरिता लागणारा निधीबाबत चर्चा करण्यात आली. भूसंपादनाची कार्य...

व्यापारी व अडते यांच्या आडमुठे धोरणामुळे शेतकरी हैराण व परेशान. शेतकर्‍यांना होणारा त्रास सहन केला जाणार नाही

Image
 व्यापारी व अडते यांच्या आडमुठे धोरणामुळे शेतकरी हैराण व परेशान. शेतकर्‍यांना होणारा त्रास सहन केला जाणार नाही                                भुषण मापारी                                          कर्तव्यदक्ष गट नेते नगर परिषद लोणार  लोणार :प्रा लुकमान कुरैशी  लोणार कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यापारी व अडते यांच्या आडमुठे धोरणामुळे  २२मार्च २०२२ पासून बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांना आपला माल खाजगी व्यापार्‍यांना कवडीमोल भावात विकावा लागत आहे . त्यामुळे बळीराजाचे फार हाल होत आहे . तात्काळ या गंभीर बाबीवर तोडगा काढत बाजार समिती पूर्ववत करावी अन्यथा  सदर बाजार समिती बंद करत शेतकऱ्यांचा माल विकण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी अन्यथा शेतकरी बांधवांना घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती च्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगर परिषद गटनेते भूषण मापारी यांनी  निवेदनाद्व...

कृषी उत्पन्न बाजार समिती ने शेतकऱ्यांना त्रास देवू नये. शेतकऱ्यांना दिला जाणारा त्रास सहन केला जाणार नाही.

Image
  कृषी उत्पन्न बाजार समिती ने शेतकऱ्यांना त्रास देवू नये. शेतकऱ्यांना दिला जाणारा त्रास सहन केला जाणार नाही. भुषण मापारी कर्तव्यदक्ष गट नेते न प                  लोणार . प्रा लुकमान कुरैशी   स्थानिक लोणार कृषी उत्पन्न बाजार समिती १९ एप्रिल २०२२ रोजी दुपारी अचानक बंद करण्यात आली. यामुळे विक्रीसाठी शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना  नाहक आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. असे गैरप्रकार नेहमीच लोणार कृषी बाजार समिती मध्ये घडत असतात. मात्र आता या गैरकारभाराने  कळस गाठला आहे. २२ मार्च २०२२ पासून बंद असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती १९ एप्रिल २०२२ सुरु झाल्याने शेतकऱ्यानी विक्रीसाठी  शेतमाल आणला. मात्र दुपारी अचानक कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्यात आली. यामुळे काही शेतकऱ्यांना शेतमाल वापस घेऊन जावा लागला तर काहींना शेतमाल तसाच ठेऊन खाली हात वापस जावे लागले. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक कोंडी सहन करावी लागत आहे. आर्थिक कोंडीमुळे शेतकरी आत्महत्या घडत आहे.  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अशा आठमुठ्या धोरणामुळे जागति...

भट उमरा जिल्हा परिषद शाळेत पूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न.

Image
  भट उमरा जिल्हा परिषद शाळेत पूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न . वाशिम    (युगनायक न्यूज नेटवर्क ) शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जून २०२२मध्ये इयत्ता पहिली मध्ये प्रवेशास पात्र असणा-या विद्यार्थ्याचे समुदेशन करून त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी भट उमरा येथील जिल्हा परिषद शाळेत शाळापूर्व तयारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  इयत्ता पहिलीत प्रवेशित विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास कितपत झाला याबाबत पडताळणी करून त्यांना प्रोत्साहन देणे व योग्य मार्गदर्शन करणे याकरीता शाळापूर्व तयारी मेळावा आयोजनला महत्त्व आहे. या मेळाव्यातून विद्यार्थ्यांच्या क्षमता कितपत विकसीत झाल्या आहेत हे कळते. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रित करता येणार आहे.यावेळी शिक्षण समिती अध्यक्ष हरीभाऊ काळे उपाध्यक्ष विनोद इंगळे, राजाराम काळे, शालिक काळे, सोपान काळे, हरिभाऊ उमाळे, बालाजी काळे, कैलास राजगुरू, गुणाजी काळे, मारोती काळे , गोलु काळे , विनोद  काळे इत्यादी मान्यवर व शिक्षकवृंद उपस्थित होते.मेळाव्यात प्रास्ताविक मोहन...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ सुरू करण्याची मुख्यमंत्री यांच्या कडे मागणी -अभंग शिंदे

Image
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ सुरू करण्याची मुख्यमंत्री यांच्या कडे मागणी -अभंग शिंदे नवी मुंबई ठाणे (विशेष प्रतिनिधी )   जय लहुजी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभंग शिंदे यांच्या माध्यमातून मा.मुख्यमंत्री व ठाणे जिल्हाधिकारी  यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ सुरू करण्यात यावे व अध्यक्षाची  निवड करण्यात यावी या मागणीचे पत्र देण्यात आले.मातंग समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ हे सुरू करण्यात आले आहे.परंतु गेली मागील सात वर्षा पासून महामंडळ हे बंद आहे.      मातंग समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी सुरू करण्यात आलेले महामंडळ हे बंद पडण्याच्या स्थितीत असून.महामंडळास कोणत्याही प्रकारचा निधी हा मागील व आताच्या सरकारने दिलेला नाही.फक्त आश्वासन देऊन मातंग समाजाची दिशाभूल करण्याचे काम सरकार करत आहे.असे आता समाज बांधवांना वाटू लागलेले आहे.  म्हणून मा.मुख्यमंत्री मंत्री साहेब यांना विनंती करण्यात आली आहे.की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महाम...