कमळजा देवी संस्थान मंदिराची जमीन प्रकरणात तहसीलदारांची कार्यालयीन चौकशी करावी- प्रकाश नागरे
कमळजा देवी संस्थान मंदिराची जमीन प्रकरणात तहसीलदारांची कार्यालयीन चौकशी करावी- प्रकाश नागरे
लोणार. (युगनायक न्युज नेटवर्क )उल्कानगरी लोणार आराध्य दैवत देवी कमळजा माता मंदिर देवस्थान दिवाबत्तीची सोय म्हणून लोणार सर्वे,नं 109 मधील जमीन ही इनाम म्हणून खलील व्यक्तींना देखभालीसाठी देण्यात आली होती त्या व्यक्तींची नावे सुभाष बंन्सीलाल बोरा,सचिन कुमार सुभाषचंद्र बोरा,प्रदीप कुमार रमणलाल बोरा,रमणलाल कचरूलाल बोरा या व्यक्तींना देण्यात आली होती परंतु कालांतराने तत्कालीन तहसीलदार,तलाठी,मंडळ अधिकारी यांच्या संगणमत करून सरकारी दस्तावेज यामध्ये खाडखोड करून परस्पर नावावर करून,व विक्री केली तरी सदर प्रकरण तसिलदार साहेब तहसील कार्यालय लोणार यांच्या कोर्टामध्ये दि,08/02/2018 मध्ये दाखल केले असून सदर प्रकरण शेवटची नोटीस 21/12/2021रोजी काढण्यात आली होती त्या नोटिशी नुसार सुनावणी 11/12/2022 रोजी 11.00वाजता ठेवण्यात आली होती तेव्हा पासून सदर प्रकरण तहसिलदाराकडून निकाली काढण्यात आले आणि परंतु आजपर्यंत सदर प्रकरण निकाल देण्यात आलेला नाही.यासंदर्भात वेळोवेळी विचारणा केली असता तहसीलदार यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आले आहेत तरी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून तहसीलदारांकडून होणाऱ्या अति विलंबाची प्रकरणात तहसीलदाराची कार्यालयीन चौकशी करण्यात यावी,यासंदर्भातील तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकाश माधवराव नागरे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME