कामगार एकत्र येऊन जो पर्यंत संघटित होत नाहीत व हक्कासाठी पूर्ण ताकतीने लढा देत नाहीत तो पर्यंत त्यांच्यावर अन्याय होत राहतील -ॲड. भारत गवळी
कामगार एकत्र येऊन जो पर्यंत संघटित होत नाहीत व हक्कासाठी पूर्ण ताकतीने लढा देत नाहीत तो पर्यंत त्यांच्यावर अन्याय होत राहतील -ॲड. भारत गवळी
वाशीम -(प्रतिनिधी जितेश गायकवाड ) कामगार कल्याण केंद्र वाशीम येथे आज दिनांक 1मे 2022 रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिना निमित्त, बांधकाम कामगार व कामगार कुटुंबीय करिता " कामगाराची दशा व दिशा कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर " आयोजित करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, माननीय श्री सुनील भाऊ कल्ले, आपत्ती व्यवस्थापक . अकोला , कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री गजानन मेसरे, कार्यक्रमाचे वक्ते माननीय ॲड, भारत गवळी, प्रमुख मार्गदर्शक मा.ॲड गजेंद्र सरपाते ,जिल्हा व सत्र न्यायालय, वाशिम, तसेच मा. श्री तेजराव वानखेडे वसुली अधिकारी वाशिम अर्बन बँक वाशिम , संजय राजगुरू , सोनाली गर्जे होते. या कायदे विषयक शिबिरात बोलताना ऍड. भारत गवळी यांनी कामगार विषयी सांगितले की, कामगार एकत्र येऊन जो पर्यंत संघटित होत नाहीत व आपल्या हक्कासाठी ताकतीने लढा देत नाहीत, तो पर्यंत त्यांच्यावर अन्याय होत राहतील . कारण या देशात भांडवलशाही कामगार वर्गावर खूप मोठा अन्याय करताना दिसत आहे . भांडवलदार वर्ग लाखो रुपयाचे उत्पादन करतो आणि महिन्याला करोडोच्या घरात उत्पादन त्यांना मिळते . परंतु कामगारांना मात्र महिन्याला काही हजार रुपये देऊन एक प्रकारे कामगारांचे शोषण करतांना दिसुन येत आहेत. प्रमुख मार्गदर्शक ऐड. गजेन्द्र सरपाते यांनी माहिती देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कशा प्रकारे कामगारांसाठी न्याय हक्क या बाबतीत तरतूद संविधानात केलेली आहे. तसेच कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे कामगार चळळीचे प्रणेते होते हे सांगितले , त्यांनी एक महत्वाची बाजू लक्षात आणून देत ,ज्या देशात दुसऱ्याच्या हाताखाली काम करणारे कामगार,अपंग व्यक्ती व वृध्द व्यक्ती यांना कशा प्रकारची वागणूक दिली जाते अथवा त्यांच्या हक्कासाठी त्यांचे सोबत कशी वर्तनुक केली जाते .यावर देशाचे भविष्य ठरत असते, की तो देश विकसित होईल किंवा नाही. म्हणून अशा लोकांना न्याय व हक्कासाठी मदत करणे आवश्यक आहे. यानंतर प्रमुख पाहुणे श्री गजानन मेसरे , तेजराव वानखेडे , सोनाली गर्जे यांनी आपले विचार व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण करताना सुनील कल्ले यांनी सुध्दा कामगारांच्या समस्यावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन श्री दाभाडे केंद्र प्रमुख यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे यशस्वी करिता बी बी पांगसे,गजानन आरू, मालती दाभाडे, मगला नवरे,अंबिका कठाडे, प्रमिला ढोके,योगेश गोटे बांधकाम निरीक्षक विभाग वाशिम .या कार्यक्रमाला सर्व कामगार बंधू भगिनी व इतर क्षेत्रातील कामगार वर्ग आवजून उपस्थित व सहभागी होते .
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME