वाशिम जिल्ह्यातील अवेळी लादण्यात आलेली लोडशेडिंग बंद करण्याची मागणी.

 वाशिम जिल्ह्यातील अवेळी लादण्यात आलेली लोडशेडिंग बंद करण्याची  मागणी.




वाशिम दि.२१(युगनायक  न्यूज नेटवर्क )सद्यस्थितीत वाशिम जिल्ह्यात तापमानामध्ये ४२ अंश सेल्सिअस प्रचंड वाढ झालेली आहे . परिणामी नागरिकांना उकाडा असह्य होत आहे . त्यामुळे सामान्य नागरिकांवर अवेळी लादण्यात आलेल्या लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत अशातच जिल्ह्यात तापमानामध्ये वाढ झाली असून उष्माघात या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत तसेच अवेळी लोडशेडिंगमुळे हिवताप , डेंग्यू , मलेरिया या आजाराने लोक भयभीत झाले असून दवाखान्यात प्रचंड गर्दी होत आहे . यामुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे . तरी मा.महोदय यांनी वरील अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून जिल्ह्यातील अवेळी लादण्यात आलेली लोडशेडिंग बंद करण्यात यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळेल व त्यांचे स्वास्थ टिकून राहील . असे निवेदन भगवान ढोले यांनी- मा . ना . उद्धवजी ठाकरे , मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य मुंबई, मा . ना . अजित पवार , उपमुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य मुंबई, मा . ना . डॉ . नितीन राऊत , उर्जामंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, मा.ना.देवेंद्र फडणवीस , विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य मुंबई, मा . कार्यकारी अभियंता , महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या . वाशिम, मा . अधिक्षक अभियंता , महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या . वाशिम यांना निवेदनाद्वारे लोडशेडिंग बंद करण्याची  मागणी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू