ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना महावितरण लोणार कडुन नाष्टा ना मिळाल्याचे राग लोणार जनतेला लोडशेडिंग च्या रूपात मिळत आहे
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना महावितरण लोणार कडुन नाष्टा ना मिळाल्याचे राग लोणार जनतेला लोडशेडिंग च्या रूपात मिळत आहे
काँग्रेस नगरसेवक आबेद खान यांचा घरचा आहेर
लोणार. प्रा लुकमान कुरैशी दिनांक २३/४/२०२२ महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राउत हे लोणार येथे १ मार्च रोजी विविध विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्याला आले होते त्या वेळी त्यांनी ग्राहक मेळावा आयोजित केला होता परंतु त्या ग्राहक मेळाव्याचे प्रचार आणि प्रसार न केल्याने त्या ठिकाणी ग्राहकच बोटावर मोजण्या इतके उपस्थित होते त्या नंतर ते त्या ठिकाणावरून लोणार येथील वनकुटी येथे अल्पोहर करण्यासाठी गेले मात्र लोणार विद्युत विभागाने त्यांची तिथे कोणतीच व्यवस्था न केल्याने त्यांनी तेव्हा पासून लोणार विषयी राग मनात ठेउन आता कारण नसतांना अतिरिक्त लोडशेडिंग सुरू केले असल्याचा आरोप काँग्रेस नगररिषद चे नगरसेवक आबेद खान मोमीन खान पठाण यांनी केला आहे सद्या सर्व समाज बांधवांचे सन उत्सव सुरू आहे त्या मध्ये मुस्लिम समाजाचे पवित्र असे रमजान चे उपवास (रोजे ) सुरू आहे या मध्ये लहान मुले वयोवृद्ध तसेच समाज बांधव उपवास(रोजे ) करतात परंतु दुपारी अतिउष्णाता व जिव घेणे तापमान असतांना ही लोडशेडिंग असल्याने जीव पाणी पाणी करतो परंतु अनेक वेळा समाज बांधवांनी विनंती करूनही लोडशेडिंग बंद केली नाही उलट अतिरिक्त लोडशेडिंग सुरू करण्यात आली आहे या मध्ये रात्री बे रात्री लाईन जात आहे त्या मुळे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कोणतेही दुजा भाव ना ही करता लोडशेडिंग बंद करावी असा घरचा आहेर नगरसेवक आबेद खान मोमीन खान पठाण यांनी केले आहे
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME