व्यापारी व अडते यांच्या आडमुठे धोरणामुळे शेतकरी हैराण व परेशान. शेतकर्‍यांना होणारा त्रास सहन केला जाणार नाही

 व्यापारी व अडते यांच्या आडमुठे धोरणामुळे शेतकरी हैराण व परेशान. शेतकर्‍यांना होणारा त्रास सहन केला जाणार नाही 



                              भुषण मापारी                                         

कर्तव्यदक्ष गट नेते नगर परिषद लोणार 


लोणार :प्रा लुकमान कुरैशी


 लोणार कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यापारी व अडते यांच्या आडमुठे धोरणामुळे  २२मार्च २०२२ पासून बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांना आपला माल खाजगी व्यापार्‍यांना कवडीमोल भावात विकावा लागत आहे . त्यामुळे बळीराजाचे फार हाल होत आहे . तात्काळ या गंभीर बाबीवर तोडगा काढत बाजार समिती पूर्ववत करावी अन्यथा  सदर बाजार समिती बंद करत शेतकऱ्यांचा माल विकण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी अन्यथा शेतकरी बांधवांना घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती च्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगर परिषद गटनेते भूषण मापारी यांनी  निवेदनाद्वारे दिला आहे . निवेदनात नमूद प्रमाणे लोणार कृषी उत्पन्न बाजार समिती १९ एप्रिल २०२२ रोजी दुपारी अचानक बंद करण्यात आली. यामुळे विक्रीसाठी शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना  नाहक आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. असे गैरप्रकार नेहमीच लोणार कृषी बाजार समिती मध्ये घडत असतात. मात्र आता या गैरकारभाराने  कळस गाठला आहे. २२ मार्च २०२२ पासून बंद असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती १९ एप्रिल २०२२ सुरु झाल्याने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी  शेतमाल आणला. मात्र दुपारी अचानक कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्यात आली. यामुळे काही शेतकऱ्यांना शेतमाल वापस घेऊन जावा लागला तर काहींना शेतमाल तसाच ठेऊन खाली हात वापस जावे लागले. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक कोंडी सहन करावी लागत आहे. आर्थिक कोंडीमुळे शेतकरी आत्महत्या घडत आहे.  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अशा आठमुठ्या धोरणामुळे जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या लोणार बाजार पेठेवरही विपरीत परीणाम होत असल्याने मंदीचे सावट पसरत असल्याची परिस्थिती आहे. शेतकरी हितासाठी सुरु करण्यात आलेली लोणार  कृषी उत्पन्न बाजार समिती जर शेतकरी विरोधात असेल तर लोणार कृषी उत्पन्न बाजार समिती कायमस्वरूपी बंद करून शेतकऱ्यांना  शेतमाल विक्रीसाठी पर्यायी व्यवस्था करून देण्यात यावी.शेतकरी हिताच्या गंभीर विषयांवर आपण उचित कारवाई करावी, अन्यथा लोणार बाजार समिती विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी. असा ही इशारा निवेदनातून दिला आहे .

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू