वाशीम येथे प्रा. डॉ. शरण खानापुरे यांची विभागीय कार्यशाळा.
वाशीम येथे प्रा. डॉ. शरण खानापुरे यांची विभागीय कार्यशाळा.
वाशीम : (विशेष प्रतिनिधी -विलास बेदरे )वाशीम येथे दि.5 जून 2022 ला अग्रसेन भवन, अग्रसेन चोक, जुनी नगर परिषद, वाशीम येथे महाराष्ट्र राज्यातील कोळी महादेव, टोकरे कोळी, मल्हार कोळी, डोंगरे कोळी, ढोर कोळी, यांना 70 वर्षा पासून संविधानिक अधिकारा पासून जाणीवपूर्वक वंचीत ठेवणाऱ्या सर्व पडताळणी समित्या, प्रांत अधिकारीआदिवासी मंत्री, आमदार, खासदार.
केंद्र सरकार कडून महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्रतील लोकसंख्येच्या आधारे आदिवासी लोकसंख्या ही 9% आहे त्या पैकी tsp मध्ये 4% च्या लोकसंख्येवर 11 आमदार आणी 2 खासदार यांचे राखीव मतदार संघ असतात/निवडून येतात,आणी उर्वरित otsp मधील 5% लोकसंखेच्या आधारे 15 आमदार आणी 2खासदार यांच्यासाठी मतदार संघ राखीव असतात,otsp मधील आदिवासी यांची लोकसंख्या दाखवून, ज्यांच्या नावाने हजारो करोड रुपये निधी उचल्ल्या जातो,आणी 15आमदार 2 खासदार, निवडून येतात,त्या कोळी जमातीला साधे जात प्रमाणपत्र, व वेधता प्रमाणपत्र सुद्धा दिले जात नाही.
ई. स.1871 पासून आज अखेर पर्यंत otsp मधील बेरार प्रांत मधील कोळी कधीही OBC /SBC मध्ये नव्हता आणी नाही.
पण महाराष्ट्र राज्यातील पडताळणी समित्या, प्रांत अधिकारी, हे जाणून बुजून या कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी डोंगरे, कोळी ढोर, कोळी टोकरे, यांना शासकीय लाभपासून वंचित ठेवत आहेत.
इंग्रज काळापासून आज अखेर पर्यंत, मा. प्रा. डॉ. शरण खानापुरे सर यांनी आपल्या अभ्यासाने, व माहितीच्या अधिकारात जमा केलेले सर्व ऐतिहासिक एथोंटिक पुरावे,याचे सविस्तर मांडणी करून, जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी मा. प्रा. डॉ. शरण खानापुरे सर यांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे.
तरी महाराष्ट्र राज्यातील, अन्यायग्रस्त,कर्मचारी, अधिकारी, व कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी टोकरे, कोळी डोंगरे, ढोर कोळी, बांधवानी या कार्यशाळेचा आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन वाशीम जिल्हा RTI मेंबर, विलास बेदरे व विलास अंभोरे हे करीत आहेत.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME