कामगार एकत्र येऊन जो पर्यंत संघटित होत नाहीत तो पर्यंत त्यांच्यावर अन्याय होतच राहतील -ॲड. भारत गवळी
कामगार एकत्र येऊन जो पर्यंत संघटित होत नाहीत तो पर्यंत त्यांच्यावर अन्याय होतच राहतील -ॲड. भारत गवळी
वाशीम (जितेश गायकवाड ) -(प्रतिनिधी ) कामगार कल्याण केंद्र वाशीम येथे आज दिनांक 1मे2022 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिन निमित्त बांधकाम कामगार व कामगार कुटुंबीय करिता कामगाराची दशा व दिशा कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित केले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुनील भाऊ कल्ले, आपत्ती व्यवस्थापक अकोला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री गजानन मेसरे, कार्यक्रमाचे वक्ते माननीय ॲड, भारत गवळी, मा.ॲड गजेंद्र सरपाते, माननीय श्री तेजराव वानखेडे वसुली अधिकारी वाशिम अर्बन बँक वाशिम हे होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता, बी. बी. पांगसे, गजानन आरु, मालती दाभाडे, मंगला नवरे, अंबिका कठाडे, प्रमिला ढोके योगेश गोटे बांधकाम निरीक्षकविभाग वाशीम आदी उपस्थित होते. त्यावेळी ऍड. भारत गवळी मार्गदर्शन करतांना बोलत कामगार एकत्र येऊन जो पर्यंत संघटित होत नाहीत तो पर्यंत त्यांच्यावर अन्याय होतच राहतील कारण या भांडवलशाहीत कामगार वर्गावर खूपच मोठा अन्याय होत असताना दिसत आहे मालक प्रत्येक दिवशी लाखो रुपयाचे उत्पादन करतो आणि महिन्याचे करोडोच्या घरात उत्पादन जाते आणि कामगारांना मात्र महिन्यात एकदा हजारो रुपये देऊन एक प्रकारे शोषण करतांना दिसुन येत आहे
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME