कृषी उत्पन्न बाजार समिती ने शेतकऱ्यांना त्रास देवू नये. शेतकऱ्यांना दिला जाणारा त्रास सहन केला जाणार नाही.
कृषी उत्पन्न बाजार समिती ने शेतकऱ्यांना त्रास देवू नये.
शेतकऱ्यांना दिला जाणारा त्रास सहन केला जाणार नाही.
भुषण मापारी कर्तव्यदक्ष गट नेते न प
लोणार. प्रा लुकमान कुरैशी
स्थानिक लोणार कृषी उत्पन्न बाजार समिती १९ एप्रिल २०२२ रोजी दुपारी अचानक बंद करण्यात आली. यामुळे विक्रीसाठी शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना नाहक आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. असे गैरप्रकार नेहमीच लोणार कृषी बाजार समिती मध्ये घडत असतात. मात्र आता या गैरकारभाराने कळस गाठला आहे. २२ मार्च २०२२ पासून बंद असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती १९ एप्रिल २०२२ सुरु झाल्याने शेतकऱ्यानी विक्रीसाठी शेतमाल आणला. मात्र दुपारी अचानक कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्यात आली. यामुळे काही शेतकऱ्यांना शेतमाल वापस घेऊन जावा लागला तर काहींना शेतमाल तसाच ठेऊन खाली हात वापस जावे लागले. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक कोंडी सहन करावी लागत आहे. आर्थिक कोंडीमुळे शेतकरी आत्महत्या घडत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अशा आठमुठ्या धोरणामुळे जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या लोणार बाजार पेठेवरही विपरीत परीणाम होत असल्याने मंदीचे सावट पसरत असल्याची परिस्थिती आहे. शेतकरी हितासाठी सुरु करण्यात आलेली लोणार कृषी उत्पन्न बाजार समिती जर शेतकरी विरोधात असेल तर लोणार कृषी उत्पन्न बाजार समिती कायमस्वरूपी बंद करून शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी पर्यायी व्यवस्था करून देण्यात यावी.असे निवेदनात म्हटले आहे की महोदय साहेब शेतकरी हिताच्या गंभीर विषयांवर आपण उचित कारवाई करावी, अन्यथा लोणार बाजार समिती विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल. याला सरस्वी प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदन तहसीलदार लोणार यांना देण्यात आले व याची नोंद घ्यावी असे ही या निवेदनात म्हटले आहे
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME