वाशिम येथे वंचित बहुजन आघाडी चा शांतता मार्च संपन्न
वाशिम येथे वंचित बहुजन आघाडी चा शांतता मार्च संपन्न
वाशीम - (युगनायक न्युज नेटवर्क )आज nदिनांक 01 मार्च 2022 रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा श्रध्येय ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी वाशीमच्या वतीने वाशिम येथील छ शिवाजी महाराज चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान जिल्हाध्यक्ष डॉ गजानन हुले यांच्या अध्यक्षतेखाली शांतता मार्च काढण्यात आला. छ शिवाजी महाराज चौकापासून पाटणी चौक मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शांततेत आली. शांतता मार्च मध्ये कुठल्याही प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या नाहीत. प्रत्येकाच्या हातात शांतता प्रस्थापित करण्यासाठी फलक घेऊन वाशिम शहरात एक नवीन आदर्श घालवून दिला. शांतता मार्च ची सांगता डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान वाशिम येथे पार पडली. शांतता मार्च समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ गजानन हुले हे होते, प्रमुख उपस्थिती म्हणून प्रदेश सदस्या किरणताई गिर्हे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ सिद्धार्थ देवळे, जिल्हामहासचिव सोनाजी इंगळे, मार्गदर्शक दत्तराव गोटे, जिल्हाउपाध्यक्ष प्रा रंगनाथ धांडे, किशोर उके, गिरीधर शेजुळ, जिल्हा सचिव उत्तम झगडे, वसंतराव हिवराळे, जिल्हा प्रवक्ता संदीप सावळे, जेष्ठ नेते सिद्धार्थ देवरे, अनिल गरकळ, कल्पनाताई राऊत जि प सदस्य, कारंजा नगराध्यक्ष शेषराव ढोके, गजानन माळेकर भारत गवळी, हे होते. कार्यक्रमाला रिसोड तालुका अध्यक्ष प्रताप मोरे, ता महासचिव रविभाऊ तिडके मालेगाव ता. अध्यक्ष सारनाथ अवचार, मंगरुळपिर ता. अध्यक्ष रमेश राठोड, ता गौतम खाडे, कारंजा ता. अध्यक्ष नागेश पाटील, ता महासचिव रवींद्र भुसारे, वाशिम ता. अध्यक्ष नारायण खोडके, मानोरा ता अध्यक्ष विनोद राठोड ता महासचिव नंदू वानखेडे, सय्यद अकील भाई, बाळासाहेब खंडारे, यांची उपस्थिती होते. समारोपीय कार्यक्रमामध्ये प्रदेश सदस्या किरणताई गिर्हे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ सिद्धार्थ देवरे, जिल्हाध्यक्ष डॉ गजानन हुले, जिल्हामहासचिव सोनाजी इंगळे, वसंतराव हिवराळे जिल्हासचिव, सिद्धार्थ देवरे, ता अध्यक्ष सारनाथ अवचार, प्रताप मोरे, रमेश राठोड, नागेश पाटील, विनोद राठोड, नारायण खोडके, शेषराव ढोके, गिरीधर शेजुळ, कल्पना राऊत यांनी संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा रंगनाथ धांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ता महासचिव संजय पडघन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, दिलीप नवघरे, डॉ जावेद भाई, अरुण बोरकर, तुषार खिल्लारे, किशोर खडसे, विष्णू सरकटे, दिलीप भगत, सुमेध वानखेडे, दत्ता शेळके, विनोद भगत,आदी उपस्थित होते
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME