भट उमरा जिल्हा परिषद शाळेत पूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न.
भट उमरा जिल्हा परिषद शाळेत पूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न.
वाशिम (युगनायक न्यूज नेटवर्क )शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जून २०२२मध्ये इयत्ता पहिली मध्ये प्रवेशास पात्र असणा-या विद्यार्थ्याचे समुदेशन करून त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी भट उमरा येथील जिल्हा परिषद शाळेत शाळापूर्व तयारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
इयत्ता पहिलीत प्रवेशित विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास कितपत झाला याबाबत पडताळणी करून त्यांना प्रोत्साहन देणे व योग्य मार्गदर्शन करणे याकरीता शाळापूर्व तयारी मेळावा आयोजनला महत्त्व आहे.
या मेळाव्यातून विद्यार्थ्यांच्या क्षमता कितपत विकसीत झाल्या आहेत हे कळते. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रित करता येणार आहे.यावेळी शिक्षण समिती अध्यक्ष हरीभाऊ काळे उपाध्यक्ष विनोद इंगळे, राजाराम काळे, शालिक काळे, सोपान काळे, हरिभाऊ उमाळे, बालाजी काळे, कैलास राजगुरू, गुणाजी काळे, मारोती काळे , गोलु काळे , विनोद काळे इत्यादी मान्यवर व शिक्षकवृंद उपस्थित होते.मेळाव्यात प्रास्ताविक मोहन कांबळे सर यांनी केले स्टॉल क्र १ सविता काळे, स्टॉल क्र 2 वंदना इंगळे मॅडम, स्टॉल 3 शिल्पा धुळे मॅडम स्टॉल क्र 4 रोकडे मॅडम, शारदा काळे मॅडम,स्टोल क्र 5 मोहन देवळे सर , स्टॉल क्र 6 समाधान गि-हे सर ,स्टॉल क्र 7 मोहन कांबळे सर यांनी खालील स्टॉल वर काम पाहिले त्यात नाव नोंदणी व रिपोर्ट कार्ड देणे, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, भाषा विकास, गणनपूर्व तयारी, मातांना साहित्य देणे व मार्गदर्शन असे सात प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME