आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी ८७ कोटी रुपयांचा धनादेश पुणे महानगरपालिकेकडे सूपूर्द
आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी ८७ कोटी रुपयांचा धनादेश पुणे महानगरपालिकेकडे सूपूर्द
पुणे,-(पब्लिक न्यूज नेटवर्क )दि. २२: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संगमवाडी येथील आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या नियोजित स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाकडील ८७ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
स्मारकाबाबत शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीस विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, समाज कल्याण उपायुक्त रवींद्र कदम पाटील, सहायक आयुक्त समाज कल्याण संगीता डावखर, स्मारक समितीचे अध्यक्ष विजय बापू डाकले, समितीचे सदस्य बाळासाहेब भांडे, रवी पाटोळे, रामभाऊ कसबे, डॉ. राजू अडागळे, शांतीलाल मिसाळ आदी उपस्थित होते.
यावेळी आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकाबाबत जागेचे भूसंपादन, स्मारकाचा नियोजित आराखडा, बांधकाम, त्याकरिता लागणारा निधीबाबत चर्चा करण्यात आली. भूसंपादनाची कार्यवाही जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME